shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'जीवनचिंतन'आणि त्यातील संस्कृतीदर्शन टिकविले पाहिजे =प्राचार्य शन्करराव अनारसे

श्रीरामपूर (वार्ताहर ): आपण जागतिकरण जगात जगत आहोत पण प्रत्येक समाजाची गरज, स्वभाव, संस्कृती,निसर्ग, राहणीमान, श्रद्धा, भक्ती आणि जीवनमूल्ये भिन्न भिन्न आणि स्थानिक भूमिकेतून आकाराला येत असतात, त्यामुळे आपली भारतीयता त्यातील ' जीवनचिंतन'आणि संस्कृतीदर्शन सकारात्मकदृष्टीने टिकविले पाहिजे,असे मत रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी व्यक्त केले. 

श्रीरामपूर =येथील डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या 'जीवनचिंतन'पुस्तकावर परिसंवाद झाला, त्याप्रसंगी डावीकडून प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ.सौ. योगिता अनारसे, डॉ. संजय अनारसे, सौ. कमलताई अनारसे, प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य टी. ई. शेळके, पत्रकार प्रकाश कुलथे, लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये आणि सुखदेव सुकळे उपस्थित होते.


   येथील प्राचार्य शन्करराव अनारसे यांच्या हॉलमध्ये प्राचार्य अनारसे यांच्या 84व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने पुस्तक परिसंवाद आणि आजचे जीवन याविषयीं चर्चा आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी प्राचार्य अनारसे बोलत होते.अध्यक्षस्थानी अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रारंभी 'जीवनचिंतन'चे  लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून 'जीवनचिंतन 'पुस्तकाविषयी विवेचन केले.बुके आणि ग्रन्थ भेट देऊन प्राचार्य अनारसे यांचा सन्मान करण्यात आला.डॉ.संजय अनारसे, डॉ. सौ. योगिता अनारसे यांनी  मनोगत व्यक्त करून साहित्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या,सर्वांचा सत्कार केला.प्राचार्य अनारसे यांनी आपल्या जीवनातला संघर्ष आणि समाजात देवासमान भेटलेली माणसं याविषयी 'जीवनचिंतन 'व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांचे पुस्तक मनाला उभारी देते असे सांगितले. पत्रकार प्रकाश कुलथे यांनी प्राचार्य अनारसे यांचे जीवन हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुयश अनारसे यांनी आभार मानले.
close