चर्मकार संघर्ष समितीची जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जि.प. मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
अहमदनगर (शौकतभाई शेख) - सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, ग्रामीण भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे,आणि अशातच प्रशासनाने मराठी शाळेची वेळ सकाळी ०७:०० ते दुपारी १२:३० अशी ठेवलेली आहे,यामध्ये त्वरित बदल झाला नाही तर चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने आ.नगर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,
दरवर्षी एक मार्चला सकाळी ०७:३० ते ११:३० अशी वेळ असणारी शाळा यावर्षी लहान बालकांचा मानसिक, शारीरिक कोणताही विचार न करता मार्च महिन्यानंतरही सकाळी ०७:०० ते १२.३० अशी अघोरी वेळ ठेवण्यात आली आहे,खरोखरच प्रशासनाला मुलांची काळजी आहे का ॽ, सात वाजता जर शाळा भरली तर मुलांनी किती वाजता उठायचं ?, किती वाजता शाळेत यायचं ?, आईने मुलाला उपाशीपोटी शाळेत पाठवायचे का ? आणि साडेबारा वाजता जर शाळा सुटली तर मुलांनी उन्हात शाळेतून घरी जायचं का ? काही मुलांना चप्पल नसते,डोक्यात टोपी नसते,पाणी नसते,अशी अवस्था ग्रामीण भागातील मुलांची आहे आणि मग हा अट्टाहास कशासाठी ?,आणि कुणासाठी ?, का शिक्षक आणि मुलांना विनाकारण त्रास द्यायचा आहे ?, खरोखर लहान बालकांची आपण काळजी घेतो का ? आणि काळजी जर घेत असेल तर ही वेळ योग्य आहे का ? आपले आजचे बालक हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत, तर त्यांना हा त्रास का ? तरीही प्रशासनाने ठरवलेली सध्याची जी ही वेळ आहे ती पूर्णतः चुकीची आहे.
जरी मुलांचा अभ्यासक्रम मागे राहिलेला असेल तरीपण मुलांचा अभ्यासपेक्षा मुलांचा जीव महत्त्वाचा आहे,आज खेडेगावांमध्ये मुले १ किंवा २ किलोमीटरवरुन शाळेत येतात. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, जेवणाचा प्रश्न - खिचडी सुरू झालेली नाही.यामुळे चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शासनास नम्र विनंती करत आहे आपण सर्व बाजूंनी विद्यार्थ्यांना त्रास होईल असे निर्णय घेऊ नका, शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे आणि असे निर्णय घेतल्याने कोणती परिस्थिती सुधारेल ॽ कोणती मुले सुधारतील ॽ याचा आपण विचार करावा,आज उन्हाळ्याचे दिवस आहेत.
ग्रामीण भागात विजेचा प्रश्न आहे.पत्रे भयंकर तापतात,झाडे नाहीत, विज असली तरीही फॅनची गरम हवा असते,आणि बालकं बिचारी मारून,मुटकून वर्गात बसतात, कशासाठी ॽ इतर जिल्ह्यामध्ये शाळेच्या वेळेत बदल होतो, आपल्या नगर जिल्ह्यातच का होत नाही ? असं का होतं ? दरवर्षी एक मार्चला शिक्षकांना निवेदन देण्याची गरज भासते ॽ शासन का लक्ष देत नाही ॽ, निवेदन दिले तरच वेळेत बदल होऊ शकतो का ॽ, निवेदन न देताही वेळेत बदल होऊ शकत नाही का ॽ प्रशासन आहे, सगळ्या बाजूने विचार करणे गरजेचे आहे, वेठीस धरणे योग्य नाही,अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) खंबीरपणे उभी राहणार आहे,प्रशासन आणि नोकरदार यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे,आज अनेक संघटना अस्तित्वात आहेत परंतु संघटनांचेही कुणी ऐकत नाही,अशी वस्तुस्थिती आहे, त्याकरिता सामाजिक संघटनांनी मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, समाजाने एकत्र येऊन चांगल्या गोष्टींसाठी लढायला पाहिजे,तरच कुठल्याही बाबींचा विचार होतो,तरी कृपया प्रशासनाने गांभीर्याने विचार करून जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत सकाळी ७:३० ते ११:३० असाच बदल करणे योग्य आहे. आणि तो करावा,अभ्यासक्रम अपूर्ण असेल तर पुढील वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करावे.
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) सर्व समाजातील सर्व संघटनांना बरोबर घेऊन याविरुद्ध आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तरी कृपया लवकरात लवकर शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असेही चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य)चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

