मुंबई:- रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे नाव “आठवा रंग प्रेमाचा” असे आहे. चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद ही प्रसिद्ध जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरुसोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

