श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - -येथील कर्तव्यदक्ष तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूरच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 


तहसीलदार पाटील यांनी शासनाच्या अमृत जवान सन्मान योजने अंतर्गत तथा तहसील कार्यालय श्रीरामपूरच्या माध्यमातून अनेक आजी-माजी सैनिकांचे बांध रस्ते ,शिव रस्ते, पानंद रस्ते ,शेती अतिक्रमण, जागा अतिक्रमण, बांध कोरणे, तसेच आपसातील भांडणे अशा प्रकारचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत,त्याचप्रकारे नायगांव येथील माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती पार्वताबाई खंडेराव देसाई (वय ७५ ) यांचा देखील २० वर्षापासून शेतीतील रस्त्याचा लढा होता,तो रस्ता आदेश देऊन व पोलीस बंदोबस्तामध्ये खुला करून दिला,अशा तहसीलदार पाटील यांच्या विविध उत्कृष्ट कार्याबद्दल त्रिदल सैनिक सेवा संघ व सैनिक विधवा पत्नी श्रीमती पार्वताबाई देसाई यांच्या हस्ते तहसिलदार कार्यालयांमध्ये यथोचित सत्काराचे आयोजन केले होते,याप्रसंगी माजी सैनिक पत्नी पार्वताबाई देसाई यांच्या हस्ते तहसीलदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला,


याप्रसंगी सत्कार स्विकारताना तहसीलदार पाटील यांचे डोळे पाणावले असल्याचे दिसून आले. या सत्काराच्या उत्तराखातर ते म्हणाले की, हे सर्व काही आपल्या त्रिदल संघटनेचे यश आहे,आपल्या त्रिदल संघटनेने नेहमी सर्व कामांबाबत योग्य पाठपुरावा केलेला आहे, आणि म्हणून हे यश आपल्या संघटनेला मिळाले, संघटन ही फार मोठी ताकद असते,मी तर फक्त एक माध्यम आहे सर्वात जास्त मेहनत आपल्या त्रिदल संघटनेचीच आहे, अशा चांगल्या कामांसाठी शासन आणी मी सदैव आपल्या पाठीशी आहे,आणि म्हणूनच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा, परंतु देशामध्ये वेगळ्या प्रकारचा संघर्ष दिसून येत आहे, त्यामध्ये देश पुढे न जाता मागे जाऊ शकतो अशाप्रकारची खंत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
 

या कार्यक्रमाप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुका उपाध्यक्ष संग्राम यादव,महिला अध्यक्षा छायाताई मोटे,माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, ऋषिकेश चव्हाण,सुनील गवळी, राम म्हैस, विलास खर्डे अमोल मेहेत्रेे,जय हिंद अकॅडमीचे सुयोग सस्कर, वसंतराव देसाई ,राजेंद्र तोरणे प्रदिप विटकरे,भगीरथ पवार सुनील भालेराव,संतोष देवराई, इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.