shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या'लॉकडाऊनच्या कविता 'संग्रहास पुरस्कार


श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या 'लॉकडाऊन कविता'संग्रहास शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर  (जि.जळगांव) चा तापी- पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर झाल्याचे फौंऊंशनचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

गोवा येथील बोरी येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय शिवमराठी साहित्य संमेलनात डॉ. उपाध्ये यांना हा पुरस्कार आज ५ जून २०२२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा  'लॉकडाऊन कविता 'संग्रह पुणे येथील प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे यांनी प्रकाशित केले आहे. या कवितासंग्रहाचे प्रकाशन शिवचरण उज्जैनकर, प्राचार्य टी.ई.शेळके,पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा.शिवाजीराव बारगळ, कवयित्री संगीता फासाटे इत्यादीच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले होते.

डॉ.उपाध्ये हे रयत शिक्षण संस्थेतून जून सन २०१७ मध्ये मराठी विभाग म्हणून पदावरुन सेवानिवृत्त झाले, आजवर त्यांची ४० पुस्तके प्रकाशित असून त्यांना विविध  स्वरूपाचे ६० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.सुखदेव सुकळे, डॉ.शिवाजी काळे, डॉ.रामकृष्ण जगताप, कवी प्रा.पोपटराव पटारे यांनी डॉ. उपाध्ये यांना  पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करून अभिनंदन केले.
close