प्रतिनिधी : स्वामीनाथ हरवाळकर
अक्कलकोट : ५ / महात्मा बसवण्णा यांची ९१७ वी जयंती अक्कलकोटच्या तहसिल कार्यालयात संपन्न झाली .
अक्कलकोट लिंगायत विरक्त मठाचे प्रमुख पूज्य बसवलिंग महास्वामीजीं यांच्या हस्ते महात्मा बसवण्णा याच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.दहिटणे पिठाचे मृगेंद्र महास्वामीजींनी बसावाआरती गायली. विश्वगुरू म.बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र व वीरशैव महिला मंडळ, अक्कलकोट यांच्या पुढाकाराने या शासकीय महापूजेचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी आयोजक स्वामींनाथ हरवाळकर म्हणाले जयंती करणे म्हणजे हा एक ऊत्सवच नाहि तर त्यांच्या विचाराची,तत्वाची, कार्याची माहीती जाणून ती अंगीकारणे.बसवण्णांनी दिलेल्या तीन वस्तु माणसाला माणूस बनवते.पहिले इष्टलिंग दुसरा अनुभव मंटप तीसरा वचन साहीत्य हे मानवी ऊन्नतीचा मार्ग आहेत याचा स्विकार प्रत्येकांनी करावा.
इष्टलिंगाशिवाय कोणालाही देव म्हणू नये. एकमेव लिंगपूजा करावी .इतरत्र कोठे न जाता फक्त अनुभव मंटपाला जावे. हेच बसवण्णांनी दिलेले लोक मंदिर आहे.वचन साहीत्यच वाचावे इष्टलिंग पूजा असो कोणताही कार्यक्रम असो पोथी पुराणात न पडता बसवादी शरणाचे ग्रंथ वाचावे असे आवाहन केले.
नायब तहसीलदार विकास पवार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा साखरे,मल्लम्मा पसारे,सुनिता हडलगी, वैशाली हावनूर,सुवर्णा साखरे, वर्षाचव्हाण, प्रा. संतोषअगरखेड,गुरुसिद्धय्या हिरेमठ,पिरप्पा जमादार, पंचप्पा धडके,अप्पू भासगी,अशोकठमके,सोमा अलुरे,धर्मराज गुंजले आदिंची उपस्थिती होती .

