झगडे यांचे समाजकार्य उल्लेखनीय
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ४ / सामाजिक बांधीलकेतून तळागाळातील समविचारांना एकत्रित करून, देश हितार्थ जनहितार्थ सत्य निष्ठेने, इमानदारीने प्रमाणिकपणाने कार्य करुन संघटनेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी सौ . अनुरिता झगडे यांना भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेद्वारा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडीपदी निवड करण्यात आली असल्याचे श्री. संतोष कांबळे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख यांनी सांगितले .
या निवडीने सौ .अनुरिता झगडे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

