शिर्डी । प्रतिनिधी :-
लाक्षणिक उपोषण ओबीसी समाज्याचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारनें कुटील डाव करून रद्द केले, ते पूर्ववत मिळावे म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर यांनी भारतमाता व श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करत उपोषणास सुरवात झाली. यावेळी मात्र उपोषणास भाजपा नेते आमदार मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

    याप्रसंगी उपोषणास भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुकाध्यक्ष श्री स्वानंद (भैय्या) रासने यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष श्री वैभव शिंदे, सरचिटणीस श्री भीमराज मुर्तडक, श्री योगेश बडे, श्री कैलासराव खोंडे, श्री नितीन वाके, गोरक्षनाथ पवार, श्री महेश आहेर, श्री योगेश घाटघर,श्री सोमनाथ शिंदे, श्री शुभम गाडेकर, श्री प्रशांत मुंडलिक, श्री संतोष बोराडे, श्री योगेश शिंदे, श्री योगेश पवार हें या उपोषणात सहभागी झाले होते.

       यावेळी प्रांतधिकारी श्री गोविंद शिंदे साहेबांनी व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण श्री गुलाबराव पाटील साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मागणीचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर आपल्या मागण्या शासनास पोहचवू असे आश्वासन दिले.

सदर प्रसंगी भाजपा नेते आमदार मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी उपोषणास भेट देत स्वतःच्या हाताने उपोषणकर्त्यांना सरबत देत उपोषण सोडवले.. यावेळी बोलतांना विखे पाटील साहेब म्हणाले कीं हें सरकार जसे मराठा आरक्षण सोबत ओबीसी आरक्षणाचे ही मारेकरी आहे ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घाट या बिघाडी सरकारने घातला आहे अशी टीका करत प्रसारमध्यमांना यावेळी उत्तर देतांना विखे साहेबांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले कीं सरकारने जरी षडयंत्र करून ओबीसी समाज्याचे आरक्षण घालवले असले तरी आम्ही पक्ष संघटनेमध्ये 27% आरक्षण देऊ. ओबीसीचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर यांनी राज्य सरकारचा कडाडून निषेध केला..
सदर एकदिवसीय उपोषण यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी श्री अशोक भाऊ पवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी श्री किरण भाऊ बोराडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री योगेश अण्णा गोंदकर यांनी केले..
आमच्या या लाक्षणिक उपोषणास समर्थन देण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर, जेष्ठ भाजपा नेते श्री गजानन शिर्वेकर, शहराध्यक्ष श्री सचिन शिंदे, श्री देवराम भाऊ सजन श्री मछिंद्र नाना वारुळे, श्री रवींद्र गोंदकर, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा संयोजक श्री राजेश शर्माजी माजी उपनगराध्यक्ष श्री मंगेश नाना त्रिभुवन, श्री सुजित गोंदकर, श्री विनायक रत्नपारखी, श्री धनंजय पाटील, संपत जाधव, रोचा जी प्रेमानी, राष्ट्रीय समाज पक्षाचे श्री नानासाहेब काटकर, श्री रमेश बनकर, संगमनेर येथील भाजपा पदाधिकारी श्री भारत गवळी , श्री दिपक भगत, कोपरगाव येथील श्री दिपक राऊत, श्री संजय खरात, श्री बद्रीनाथ वाघचौरे, श्री गणेश सोनवणे, श्री सोमराज कावळे, श्री नरेश सुराणा,श्री गणेश कोते, श्री रघुनाथ गाडेकर, सौं, संगीता ताई गाडेकर, सुशील कासार, श्री दादासाहेब काळे, संजय मुदलियार, श्री किरण बर्डे, गणेश शेळके, अक्षय मुळे, प्रसाद शेलार आदी मान्यवर या उपोषणास पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.