श्रीरामपूर । प्रतिनिधी :
मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मस्जिद वरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूर मध्ये आंदोलन व सय्यद बाबा चौक येथील मस्जिद समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

यामुळे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन  होत आहेत..! आंदोलन कर्त्याना पोलिस अटक करत आहेत.. 
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना  जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, डॉक्टर संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे,शुभम शिंदे मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.