◼️ अनेक महिला आंदोलनात सहभागी! चंद्रपूर◼️किरण घाटे◼️ -

चंद्रपूर-जिल्ह्याच्या गडचांदुर समिप असलेल्या बिबी  येथील एका मुस्लिम समाजातील तरुणीला तिचा पती नामे इरशाद मुस्तफा शेख ( रा. बल्हारपूर )याने भ्रमणध्वनीवरून तलाक दिले .लग्नाला तीन वर्ष झाल्या नंतर तिला मुलंबाळं झाले नाही या कारणास्तव तिचा पती , सासु सासरे व  सासर कडील अन्य मंडळी त्या विवाहीत तरुणीला सातत्याने शारीरीक ,मानसिक व आर्थिक त्रास देत होते .
 एव्हढेच नाही तर दि.३०-५-२२ला मारझोड करून तिला घराबाहेर काढले. भारत सरकारने तीन तलाक पासून  मुस्लिम महिलांचे संरक्षण करण्याकरीता २०१९मध्ये मुस्लिम महिला विवाहा वरील अधिकारांचे संरक्षण कायदा बनविला तदवतंच तो कायदा लागू केला .या कायद्याच्या कलम ३व ४अन्वये बल्हारपूर पोलिसांनी तक्रार केल्यानंतर इरशादवर कारवाई करायला हवी होती.परंतु संबंधित पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील व अन्य पोलिसांनी त्या तरूणावर कारवाई केली नाही. या प्रकरणातील त्या पिडीत तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाऊल उचलेले असुन त्यांनी आज सोमवार दि.२०जूनला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी ११ते सायंकाळी ५वाजे पावेतो एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते .या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या शबनम कुरेशी , परविन सय्यद , भारती धाबेकर व शाफिया फारुकी यांनी केले . आजच्या आंदोलनात चंद्रपूर व बल्हारपूर येथील शेंकडों महिलांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला होता . संध्याकाळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची एका शिष्टमंडळाने भेट घेत त्यांना या बाबतीत एक निवेदन सादर केले.या वेळी अनेक महिला उपस्थित होत्या.सदरहू प्रकरणातील इरशादवर पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या शबनम कुरेशी यांनी दिला आहे.दरम्यान या निवेदनाच्या प्रति महाराष्ट्राचे‌ मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, मुख्य सचिव गृहविभाग मुंबई, पोलिस महासंचालक मुंबई व पोलिस महानिदेशक नागपूर यांना पाठविण्यात आल्या असल्याची माहिती शबनम कुरेशी व परविन सय्यद यांनी दिली.