shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचा आंधळा कारभार ; तक्रारदारासच बजावली मांगूर संवर्धन बंद करण्यासाठी नोटीस


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

इंदापूर: दि. २०/  पुणे येथील मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 या गावामध्ये शासनाची बंदी असलेल्या मांगूर मासे पालन राजरोसपणे सुरू सुरू आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या गोविंद पाडुळे या सामाजिक  कार्यकर्त्यासच मांगुर साठा नष्ट करण्यासाठी नोटीस बजावली.

याबाबत  बोलताना गोविंद पाडुळे  यांनी सांगितले कि मी माझ्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचे शासनाची बंदी असलेले मांगूर  पालन करत नाही, मीच मांगुर मासे पालन विरोधात तक्रार दिली होती. शिर्डी एक्सप्रेसला कित्येक वेळा बातमी ही दिली होती परंतु या तक्रारीवर कोणतीही कारवाई न करता मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रास देण्यासाठी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता चुकीची नोटीस बजावली आहे. याबाबत त्यांनी कोणतीही खातरजमा केलेले नाही. मांगुर संवर्धकांच्या सांगण्यावरून व आर्थिक हव्यासापोटी अधिकाऱ्यांनी असे केले आहे. त्यामुळे मांगुर संवर्धक व मत्स्य व्यवसाय अधिकारी यांची हातमिळवणी असून त्यांचे आर्थिक हितसंबंध तपासले जावेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे.

मत्स्यव्यवसाय अधिकारी  जाणून-बुजून मानसिक त्रास देऊन तक्रारदारास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. मत्स्यव्यवसाय अधिकार्यांनी तक्रारदाराचे नाव उघड केल्यामुळे तक्रारदाराच्या जीविताला धोका उत्पन्न होत आहे. यापूर्वी मांगूर संवर्धकांनी पाडुळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
close