shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील नाव्होलीत सासऱ्याने घातला सुनेच्या डोक्यात धोंडा !!


प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधि :- 

घरगुती कारणावरून दारूच्या नशेत  सासऱ्याने सुनेच्या डोक्यात दगड घालून सुनेचे डोके फोडल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.



केज तालुक्यातील नाव्होली येथे दि. १८ जून रोजी दि. १८ जून रोजी सुदाम गोवर्धन बिक्कड हे दारू पिऊन त्यांच्या पत्नीशी वाद घालीत होते म्हणून त्यांची सून कौशल्या रामकृष्ण बिक्कड ही त्यांना समजून सांगण्यासाठी गेली. त्यामुळे सुदाम बिक्कड याने त्याची सून कौशल्य बिक्कड हिच्या डोक्यात दगड मारला त्यामुळे कौशल्य हिचे डोके फुटले आहे. 


नांदूरघाट येथील आरोग्य केंद्रात उपचार घेऊन आल्या नंतर दि. १९ जून रोजी कौशल्य बिक्कड हिने तिचा सासरा सुदाम बिक्कड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गु र. न. २४८/२०२२ भा. दं. वि. ३२४ व ५०४ नुसार सुदाम बिक्कड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्याच्या नांदूरघाट दूरस्थ पोलीस चौकीचे पोलीस नाईक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.

close