मनोबल वाढविण्यासाठी योगासन महत्वाचे - प्राचार्य एम .एम .तांबे
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २१ / अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षिका प्रतीक्षा गुंड यांचे मार्गदर्शना खाली योगासन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य एम .एम . तांबे सर यांनी योगासनाचे जीवनात असणारे महत्व याबद्दल उपस्थितांना माहिती दिली .
नियमीत योगासन केल्याने शरीरास उर्जा मिळते व शरीर निरोगी राहून मन प्रसन्न रहाते . योगासना मुळे मनोबल वाढते अशी माहिती प्राचार्य तांबे सर यांनी दिली .
प्रा. सुनिल जाधव सर यांनीही योगदिना निमित्त सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर संपत्ती ही जीवनात महत्वाची असून त्यासाठी नियमित योग करणे अत्यंत आवश्यक आहे .
यावेळी न्यू लॉ कॉलेजचे विद्यार्थी विकास अधिकारी श्री . डॉ .अतुल मोरे , राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रा. गिरिष हिरडे, तालुका समन्वयक प्रा. परकाळे, प्रा. रामेश्वर दुसुंगे, डॉ बी .डी . पांढरे, प्रा. सुनिल जाधव, प्रा. भवाळ , प्रा. अनुराधा मते , प्रा. पुनम वड्डेपल्ली, प्रा. प्रियंका सुळे , पाचे सर, प्रा. मोरे, प्रा. अतुल म्हस्के , सौ . हेमा कदम, श्री .कानडे सर, नारायण पाखरे, महेश केदार , शरद पुंड आदी उपस्थित होते .

