चंद्रपूर -किरण घाटे -
अधिवक्ता स्व.रामकृष्ण धोटे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील अश्या शब्दात भद्रावती नगरीच्या सेवानिवृत्त शिक्षिका व जेष्ठ लेखिका प्रभावती नागापूरे यांनी आपले विचार व्यक्त केले.त्या काल सोमवार दि.२०जूनला स्व.रामकृष्ण धोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या .त्यांनी आपल्या बोलण्यातून त्यांच्या अनेक जुण्या आठवणींना या वेळी उजाळा दिला. या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभावती नागापूरे यांनी विभूषित केले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य नेफडोचे अध्यक्ष बादल बेले , डॉ.लखन अडबाले , दिलीप धोटे , संजय पावडे , नेफडोचे माहिती व जनसंपर्क अधिकारी दिलीप सदावर्ते, शिवाजी धोटे , महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका व सुपरिचित लेखिका अधिवक्ता मेघा धोटे आदीं मान्यवर मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती .
आयोजित कार्यक्रमात बोलतांना अनेक मान्यवर मंडळींनी स्व.रामकृष्ण धोटे यांचे जिवन कार्यावर प्रकाश झोत टाकला.अतिशय भाऊक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजूराच्या सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते यांनी केले . कार्यक्रमाला विजयकुमार जांभूळकर,संतोष देरकर , भास्कर करमरकर , नितिन जयपूरकर ,मंजुषा जयपुरकर , जयश्री देशपांडे, अंजली गुंडावार , ओमप्रकाश गुंडावार , अरविंद लांडे ,मंदार धोटे ,ज्ञानदा धोटे , महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य संयोजिका सुविद्या बांबोडे बापू धोटे यांचेसह शहरातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.चुनाळा येथील गोरक्षण व छात्रावास येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण, बेडशीट व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , सहकारी , मित्रपरिवार धोटे परिवार ,व संस्थेचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

