shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतंजली परिवाराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पतंजली परिवाराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी: आज २१ जून ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. हळूहळू लोकांना योगा बाबतचे महत्व व योग हाच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे हे पटायला लागले आहे याच संकल्पनेतून मागील १८ वर्षापासून इंदापूर येथे मोफत स्थाई वर्ग घेतला जातो यास दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यातील साधकांचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे मत सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ  माने यांनी आज योग महोत्सवानिमित्त व्यक्त केले .
आज शहा संस्कृतिक भवन येथे  सर्वपक्षीय पदाधिकारी  अंकिताताई शहा , विशाल  बोंद्रे,  महादेव सोमवंशी मेजर ,  वसंत माळुंजकर डॉ. श्रेणिक शहा,  अंगद शहा,  शेखर पाटील,  धनंजय पाटील, पोपट शिंदे, महेंद्र  रेडके,  गोफणे साहेब , अंकुश  पाडूळे,  रोहिदास पवार,  अनिल पवार,  दुर्वास शेवाळे, सौ रोहिणी भाजी भाकरे, सौ उज्वला गायकवाड, सौ शारदा नागपुरे, सौ सविता बंगाळे, सौ वर्षा मखरे व बहुसंख्येने इंदापूर तालुका व शहरातील पुरुष व महिला साधक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते तसेच याप्रसंगी वय वर्ष ८७ असून सुद्धा दररोज न चुकता वर्गास उपस्थित राहणाऱ्या सौ साखरबाई चोरमले तसेच नित्य वर्गामध्ये सर्वांच्या अगोदर येऊन सर्व कामे उत्साहाने करणारे  अंकुश ढुके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इंदापूर तालुक्यातील विविध १५ हायस्कूल यांनी मागणी केल्याप्रमाणे योग शिक्षक  व शिक्षिका यांनी शाळेमध्ये उपस्थित राहून योग दिन त्या शाळेमध्ये पण उत्साहात साजरा केला.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतंजली योग समितीचे अध्यक्ष  मदन चव्हाण यांनी केले तसेच संजीवन योग सेवा संस्थेचे अध्यक्ष  दत्तात्रेय अनपट यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच किसान सेवा समितीचे अध्यक्ष  शहाजी बोराटे व महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ मायाताई विंचू यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निर्मला कवितके यांनी केले.
close