सोलापूर : २४ / इंडियन प्रेस क्लब संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे स्वामीनाथ हरवाळकर यांची एकमताने निवड केल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांनी दिली.
इंडियन प्रेस क्लबची बैठक कराड येथे पार पडली. यावेळी सघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील, कार्याध्यक्ष अब्दुल शेख, खजिनदार जावेद मुजावर उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या पहिल्या कार्यालयाचे उदघाटन कोल्हापूर येथे होणार आहे.
पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत राज्य व केंद्र सरकारकडे निवेदन देणार असून त्याची दखल शासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांनी सांगितले. माऊली खटावकर यांनी आभार मानले.

