shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे पळसदेव येथे भाजपच्या वतीने जंगी स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे पळसदेव येथे भाजपच्या वतीने जंगी स्वागत
इंदापूर प्रतिनिधी:भारत देशाच्या  केंद्रीय अर्थमंत्री, भाजपच्या वरिष्ठ नेत्या निर्मलाताई सितारमण या आज इंदापुर वरून पुणे येथे जात असताना पळसदेव या ठिकाणी त्यांनी धावती भेट दिली. यावेळी निर्मला सितारमण यांचे पळसदेव भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.  "बारामती लोकसभा प्रवास दौरा" हा कार्यक्रम व्यस्त असताना देखील निर्मलाताईं सितारामन यांनी वेळात वेळ काढून उपस्थित भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी पळसदेव ग्रामस्थ आणि पळसदेव भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री गणेशाची मुर्ती आणि शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी निर्मला सितारमण यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , कर्जत-जामखेडचे विधान परिषदेचे आमदार रामजी शिंदे , राजवर्धन पाटील  उपस्थित होते.  

यावेळी पळसदेव भाजपचे अध्यक्ष रावसाहेब काळे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भुषण काळे, माजी संचालक शरद काळे, भाजप युवा नेते पिंटु काळे, माजी सरपंच संतोष काळे,  महेंद्र काळे, माजी सरपंच अनिल कुचेकर, माजी सरपंच अंकुश जाधव तसेच पळसदेव भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close