*भिमाई आश्रमशाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकांना अभिवादन* !
राजे उमाजी नाईकांची शौर्यगाथाचं त्यांना आद्यक्रांतिवीराची उपाधी देऊन गेली* : नानासाहेब सानप यांचे प्रतिपादन*
*इंदापूर प्रतिनिधी ( दि.७) छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लढणारे, जेजुरीच्या खंडेरायाचे निस्सीम भक्त असणाऱ्या आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकांनी इंग्रजी राजवटी विरुद्ध बंडाचे निशाण फडकावले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वराज्य पुनर्स्थापित करण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध असहकराचा जाहीरनामाचं प्रसिद्ध केला होता.तो एक प्रकारचा स्वराज्याचे पुकार केल्याचे प्रतीक ठरला. असे प्रतिपादन नानासाहेब सानप यांनी केले.
ते भिमाई आश्रमशाळेत आयोजित राजे उमाजी नाईकांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भिमाई आश्रमशाळेचे सहशिक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कु. आर्या रुपनवर, कु. अक्षरा सवाणे (इ.५ वी) ह्या विद्यार्थीनींची तसेच सहशिक्षिका मनिषा जगताप यांची भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.

