shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 मुलींना केज येथे सायकल वाटप..!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुका भाजपा च्या वतीने 100 होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले बहुतांश विद्यार्थिनी या कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या किंवा काही कारणास्तव त्यांचे वडील हयात नसणाऱ्या होत्या त्यांना या वाढदिवसाच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळावी ,समाजात त्यांच्यासाठी किणीतरी आधार आहे असे वाटावे व त्यांच्या ज्ञानार्जनाला गती मिळावी यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता ,


या सायकलचे वाटप बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते करणयात आले सर्व 100 मुलींना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला सर्व विद्यार्थिनींनी खा.प्रीतमताई मुंडे यांच्यासोबत फोटो काढून संवाद साधला त्या बोलताना म्हणाल्या की या छोट्या विद्यार्थिनी हे उद्याच भविष्य आहेत,त्यांच्या गगणभरारील सायकलच्या माध्यमातून बळ मिळावं त्यांच्या प्रयत्नांना आणि ज्ञानार्जनाला गती देणारा व नेत्रत्वाच्या कार्याला अभिप्रेत असलेला सामाजीक उपक्रम केज भाजपाने राबवला त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करून सर्व संयोजकाचे अभिनंदन केले.

या वेळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी)  माजलगाव मतदार संघाचे नेते रामेशराव आडसकर यांनी पण लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व अशा सामाजिक कार्यक्रमासाठी आम्ही सतत सोबत राहू असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले व आभार भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी केले या ,कार्यक्रमाचे आयोजन जी.प सदस्य विजयकांत मुंडे , ऋषिकेश आडसकर,विष्णू घुले,सुनील आबा गलांडे डॉ वासुदेव नेहरकर,भगवान केदार,रमाकांत बापू मुंडे,डॉ योगिनी थोरात,मुरलीधर ढाकणे, वसंत केदार,डॉ धनराज पवार व बाबा चौरे,महादेव सूर्यवंशी, अतुलराजे इंगळे  यांनी केले होते ,या कार्यक्रमास केज पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मोराळे साहेब नायब तहसिलदार सचिन देशपांडे, केज पोलीस स्टेशन चे प्रमुख वाघमोडे साहेब व सर्व भाजपा कार्यकर्ते  विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
close