कोपरगाव ते अहमदनगर प्रमुख राज्य महामार्ग जो आता राष्ट्रीय महामार्ग झाला.. हा महामार्ग कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहूरी, अहमदनगर तालुक्यातून जातो.. त्याच बरोबर संगमनेर व अकोले तालुक्यातील पगारी ,पेन्शनर व होणारे पगारी ह्याच रस्त्याने जिल्ह्यातील मुख्यालयात कायम जातात..!
हा रस्ता १९९० पासून खराब आहे.. आजवर ह्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले म्हणून अथवा रस्ता खड्डे युक्त आहे म्हणून अथवा खड्ड्याचे रस्त्याचा टोल घेतला जातो म्हणून कोणत्याही पगारी, पेन्शनर व होणाऱ्या पगारी ने सत्याग्रह आंदोलन केल्याचे आठवत नाही दिसत नाही.
ह्या तीस वर्षाच्या प्रमेयाने एक गणितातील नवीन सिध्दांत निर्माण केला आहे.. जो पगारी, पेन्शनर व होणारा पगारी रस्त्याचे गुणवत्ता, खड्डे, वृक्ष, टोल ह्या संदर्भात बोलत नाही तो पगारी, पेन्शनर व होणारा पगारी.. ठेकेदारांचा ठेकेदार आहे.. त्यामुळे ते रस्त्या साठी रस्त्यावर कधी उतरले नाही उतरणार नाही
भारत सरकार चे रस्ता मंत्री चंद्रावर रस्ता बनवतील .. पण अहमदनगर मध्ये रस्ता बनवू शकणार नाही.. कारण चंद्रावर पगारी, पेन्शनर व होणाऱ्या पगारी ची संघटीत टोळी नाही.. ज्यांना जनतेच्या मालमत्तेची, जनतेच्या सेवेची , शासनाचे मालमत्तेची, शासन सेवेची चिंता नाही.. त्यांना मतदारांनी आता पुरते ओळखले आहे
पगार व पेन्शन यांना तुमच्या करा तुन दिली जाते.. आणि रस्त्याची खड्डे बुजवणे साठी तुमच्याच कर रूपी भरलेल्या निधीतून येतो.. कधी पगारी पेन्शनर कुठल्या खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराला म्हणाला! ,पहिला गोल खड्डा चौकोणी कर त्यात खाली डांबर मार भरपूर, मग खडी टाक डांबर टाक, रोलींग कर, आणि नंतर खडी डांबर चे मिश्रण टाक.. बघू पुन्हा कसे खड्डे पडतात..
पगार व पेन्शन बरोबर लागणारी टक्केवारी हेच रस्त्याचे दुरावस्थेचे मुख्य कारण.. आता वरील मतदार संघातील जनतेने जागृत होण्याची वेळ आलेली आहे..वेळ आली आहे पारंपारिक उमेदवार नाकारण्याची... ज्यांना सामान्य माणसा ऐवजी स्वत:च्या संपत्तीची व सत्तेची काळजी आहे त्यांना घर सांभाळून ठेवण्यासाठी घरीच पाठवावे
विशेष म्हणजे सगळ्याच मतदार संघातील लोकप्रतिनिधी रस्ते कामाची गुणवत्ता बाबत काहीच बोलताना दिसत नाहीत.. फक्त म्हणतात मी निधी साठी पाठपुरावा केला , मी निधी आणला.. मग हे पण सांगा मला काय मिळाले त्या बदल्यात..
मा नितीन गडकरी साहेब.. जर तुम्ही चंद्रावर रस्ता करण्याची क्षमता बाळगता, तर, आम्ही भ्रष्ट लोकप्रतिनिधी यांना देखील स्वतः च्या एका मताने चंद्रावर पाठवू शकतो.. आमच्या अहमदनगर ते कोपरगाव रस्त्याचा ज्यांनी चंद्र केला (खड्डे युक्त) त्यांना वरील मतदार संघातील जनता निश्चितच आपल्या एका मताद्वारे चंद्रावर खड्ड्यात गाडुन दाखवतील.. सावधान!
सामाजिक कार्यकर्ते
संजय भास्करराव काळे
कोपरगाव.

