shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यसन मुक्त समाजाच्या निर्मिती साठी माजी सैनिकांची आवश्यकता ; ती तिरंगा संस्थेच्या माध्यमातून भरून निघेल-पोलीस निरीक्षक प्रताप दराडे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२

व्यसन मुक्त समाजाच्या निर्मिती साठी माजी सैनिकांची आवश्यकता ; ती तिरंगा संस्थेच्या माध्यमातून भरून निघेल-पोलीस निरीक्षक प्रताप दराडे..!!
उंबरे : व्यसन मुक्त समाजाच्या निर्मिती साठी माजी सैनिकांची आवश्यकता आहे ती या तिरंगा संस्थेच्या माध्यमातून भरून निघण्यास मदत होईल असे मत कार्यक्रमच्या उदघाटन प्र माच्या अध्यक्षस्थान श्री. दराडे यांनी भूषवले.
 
     या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विक्रम तांबे (जि.स.अ.नगर), श्री नामदेवराव ढोकणे(चेअरमन डॉ बा बा तनपुरे स.सा.राहुरी) श्री सुनील अडसुरे (संचालक,डॉ बा बा तनपुरे स.स.राहुरी)श्री माधवराव येवले (पशुवैद्यकीय अधिकारी),श्री बाळू नाना बानकर(अध्यक्ष वारकरी संप्रदाय राहुरी तालुका)श्री डॉ रामकृष्ण ढोकणे ( प्रा. ग्लोबल स्कूल राहुरी) हे उपस्तीत होते.
 
      या प्रसंगी वरील पाहुण्यांचे भाषण झाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून सुभेदार मेजर अरुण फाटके साहेब यांनी भूषवले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद बानकर यांनी केले तिरंगा माजी सैनिक सेवासंघ चे आद्यप्रवर्तक पंढरीनाथ बानकर मेजर अध्यक्ष ,बाळकृष्ण येवले मेजर, जालिंदर पाटोळे मेजर,सचिव सीताराम ढोकणे मेजर, विश्वस्त सीताराम पाटोळे मेजर,शंकर गायकवाड मेजर,गोरक्षनाथ ढोकणे मेजर तसेच या प्रसंगी आदिक मेजर ,तारडे मेजर, सूर्यवंशी मेजर, वाघमारे मेजर, तिडके मेजर दत्तात्रय सांगळे मेजर,वांढेकर मेजर,तमनर मेजर, राजळे मेजर, आवारे मेजर, कवडे मेजर तसेच ह.भ.प. डेंगळे महाराज यांची उपस्थिती लाभली 
 
       या कार्यक्रम प्रसंगी श्री. नामदेवराव ढोकणे (चेअरमन डॉ.बा.बा. तनपुरे सह. साखर कारखाना राहुरी) यांनी ११००० /- रु. तसेच श्री तारडे मेजर यांनी ५०००/- देणगी स्वरूपात संस्थेला दिले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close