shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खोटेनाटे अ‍ॅट्रॉसिटीचा चा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध एकवटले देहरे गाव..!

नगर । प्रतिनिधी:-
देहरे ता. नगर जि. अहमदनगर येथील रस्त्याच्या वादातून खोटे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कचरू आंबेडकर नामक व्यक्ती आपल्या सहकाऱ्या सोबत उपोषणास बसले आहेत, तरी संबधित व्यक्तीने केलेले सर्व आरोप खोटे असून, सदर रस्त्यावरील अतिक्रमण हे पोलीस संरक्षणात काढून रस्ता खुला केला आहे. त्याबद्दलचे सर्व पुरावे व कागतपत्रे संबंधित यांचेकडे आहेत. त्यामुळे या गोष्टीचा मनात राग धरून व गावातील इतर काही विरोधी व्यक्तीने भरीस घातल्यामुळे आमच्यावर खोटा अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा नोंदवण्यासाठी सदर व्यक्ती सोशल मीडिया वर व्हिडिओ फिरवत असून, मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसला आहे, असे लांडगे मळ्यातील लांडगे, मोरे, बराट आदी सर्व शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल होऊ नये. यावेळी निवेदन दि.१२आक्टोबर २०२२ रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक व मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तरी याबाबतीत सदर तक्रार खोटी आहे. हे दाखवून देण्यासाठी  देहरे गावातील नागरिक आपली उपस्थिती लावली होती.

यात गावचे सरपंच बबन करंडे, शिवसेना नेते संदेश कार्ले, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पटारे, मा.अध्यक्ष रमेश काळे पा. वडगाव गुप्ता चे सरपंच विजय काका शेवाळे, देहरे गावचे ग्रा. पंचायत सदस्य अजित काळे, रमेश काळे, किरण लांडगे, मेघनाथ धनवटे, अनिल चोर, मा. पंचायत समिती सदस्य अरुण लांडगे, सो.व्हा.चेरमन विजय लांडगे, सो.सदस्य गणपत काळे, अर्जुन काका काळे, डॉ.जाधव मच्छिंद्र पटारे, नाना लांडगे युवा नेते महेश काळे, नितीन भांबळ,सुहास गोपाळे, सूरज धनवटे रामेश्र्वर काळे, गणेश ठाणगे, विजय गायकवाड आजी माजी सैनिक संघटनेचे मेजर सुनील बालवे, बाजीराव काळे, दत्तात्रय धनवटे, संतोष काळे आणि गावातील सर्व माजी सैनिक व बाधित लांडगे मळ्यातील सर्व शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. सदर रस्ता खुला करण्यासाठीं सर्व शेतकरी मागील ३ वर्षा पासून रीतसर मार्गाने रस्ता होण्यासाठी लढा देत होते, तो रस्ता झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
close