प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
इंदापूर: दि. १/ राष्ट्रीय हरित लवाद ने मांगुर मासा यावर बंदी घालून व माशा चे साठे नष्ट करण्याचे आदेश देऊन पण मस्त्य विभाग मांगुर माश्याच्या उत्पादनावर फक्त बगघ्याची भूमिका घेत होते.
मांगुर मासा च्या उत्पादना मुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण , हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण हे होत आहे तसेच या माशा च्या उत्पादना साठी खाद्य म्हणून म्रुत जनावरांचे मास वापरले जाते. या मुळे फिरस्ती कुत्र्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरस्ती कुत्र्या मुळे माणसांचे व जनावरांच्या जीवनाला धोखा निर्माण झाला आहे .याच बरोबर उजनी पाणलोट क्षेत्रा मध्ये मांगुर माशा चे उत्पादन होत असल्याने हे मासे उजनी धरणामध्ये पण शिरकाव केला आहे या मुळे उजनी मधील जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच पारंपरिक माशांचे जीवन धोक्यात आले आहे. यावर मस्त्य विभाग वारंवार तक्रार करून कोणतीही ठोस कार्यवाही करत नव्हते.
या विषयावर राज्याचे माजी उपमुख्यंत्री व विरोधी पक्ष नेते मा. अजित दादा पवार यांच्या कडे तक्रार केली असता त्यांनी लगेच पुण्याच्या मस्त्य विभागाशी संपर्क करून लवकर मांगुर मासा शेती बंद झाली पाहिजे असे आदेश दिले यावर ठोस कार्यवाही नाही झाली तर सरकार ला जागं करू असे देखील सांगितले. यानंतर मस्त्य विभाग जागा झाला आहे. होणाऱ्या ठोस कार्यवाहीवर नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः इंदापूर तालुक्यामध्ये सर्वत्र शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशाचे बेकायदेशीरपणे उत्पादन राजरोसपणे सुरू आहे.

