shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते मारुतराव घुले पाटील  ज्ञानेश्वर साखर कारखान्याची ५१वी सर्वसाधारण सभा संपन्न


डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार-नरेंद्र घुले पाटील

प्रतिनिधी : प्रविण देशमुख

भेंडा : १  /    केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहिल्यास अनेक वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे केंद्र सरकारचे नवीन ध्येय-धोरणा प्रमाणे 
प्रतिदिन १ लाख लिटर इथेनॉल निर्मिती व्हावी यासाठी डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्पाचे  विस्तारीकरण व आधुनिकीकरण  करणार असल्याची घोषणा  लोकनेते मारुतराव घुले पाटील  ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केली.

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी १.००वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली  व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली.

कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे,संचालिका सौ.रत्नमाला नवले,सौ.लताताई मिसाळ, दिलीपराव लांडे,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते,माजी उपसभापती किशोर जोजार,काशीनाथ नवले,तुकाराम मिसाळ, भय्यासाहेब देशमुख,संचालक काकासाहेब शिंदे,प्रा.नारायण म्हस्के,पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, बबनराव भुसारी,गोरक्षनाथ गंडाळ, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,विष्णू जगदाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर  माऊली व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

श्री.नरेंद्र घुले पुढे म्हणाले, मागील हंगामात १६ लाख ६१ हजार  मेट्रिक टन  ऊसाचे उच्चांकी गाळप केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११ कोटी ६१ लाख ३२ हजार १३३ युनिट वीज निर्मिती झाली. त्यापैकी ७ कोटी ४ लाख ५१ हजार ३२० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली.डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी ४८ लाख ३९ हजार ८४ लिटर अल्कोहोल व १ कोटी २७ लाख २६ हजार ३३० लिटर इथेनॉल ची निर्मिती करून ते सर्व इथेनॉल ऑइल कंपन्यांना पुरविण्यात आले आहे.यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू होईल या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यास शेतकरी-कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हे लक्षात घेऊन प्रतिदिन १००० मेट्रिक टनाने ऊस गाळप क्षमता वाढविण्यात येणार आहे,त्यामुळे एप्रिल महिन्याअखेर उपलब्ध सर्व ऊसाचे गाळप पूर्ण होईल. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आले तर नाशिक,नगरसह मराठवाड्यातील सर्व जिल्हे सुजलाम-सुफमाल होतील,त्यासाठी सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

पुरुषोत्तम सर्जे यांनी शेतकऱ्यांना अधिक ऊस दर मिळेल यासाठी संचालक मंडळाने कराव्या लागणाऱ्या सर्व उपाय योजना कराव्यात,इथेनॉल निर्मिती वाढवावी अशी सूचना केली. रामराव भदगले यांनी पाणी उपलब्धतेमुळे ऊसाचे उत्पादनात वाढ झाल्याने ऊस गाळप क्षमता प्रतिदिन १५ हजार मेट्रिक टन करावी, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी केली.

शेतकरी संघटनेचे नेते अंबादास कोरडे यांनी मागील हंगामात उच्चांकी गाळप केल्याबद्दल व्यवस्थापन व कामगारांचे अभिनंदन करून इथेनॉल निर्मिती क्षमता प्रतिदिन १ लाख लिटर करावा असा ठराव मांडला.त्यास उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. माजी संचालक कॉ.शशिकांत कुलकर्णी म्हणाले, शेतकऱ्यांना जास्तीचा भाव आणि ठेविचा व्याज दर वाढून दयावा अशी मागणी केली.यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,अंकुश काळे,संचालक काकासाहेब नरवडे,जगन्नाथ कोरडे,रामनाथ राजपूरे,डॉ.अशोकराव ढगे, ज्ञानदेव पाडळे यांनी ही चर्चेत सहभाग घेतला.

सर्व ठराव मंजूर...

सभेत व्हीएसआय पुणे, यांचे प्रकल्प अहवालानुसार ४५ हजार लिटर प्रति दिनी क्षमतेच्या डिस्टीलरीचे व ५० हजार लिटर प्रति दिनी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्प उभारणीबाबत विचार विनिमय करणे, प्रकल्प उभारणीसाठी स्वनिधी उपलब्धते करीता हंगामातील ऊस बीलातुन परतीच्या ठेवी स्विकारणे बाबत निर्णय घेणे,हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप होणारे ऊसाचा वाजवी व किफायतशीर दर राज्य शासनाचे धोरण पध्दतीने अदा करणेचे धोरणाची नोंद घेणे यासह  सभेपुढे ठेवण्यात आलेले इतर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सभा नोटीसीचे  वाचन केले.  सचिव रवींद्र मोटे यांनी अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करणारा ठराव मांडला व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले.रामनाथ गरड यांची अहवाल वाचन केले.

यावेळी डॉ.शिवाजी शिंदे,गणेश गव्हाणे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे,दादा गंडाळ, संजय कोळगे,कारखान्याचे जनार्दन पटारे,बबनराव धस,रामभाऊ पाउलबुद्धे,मोहनराव गायकवाड, मिलिंद कुलकर्णी,शिवाजीराव गवळी,रावसाहेब निकम,उत्तमराव आहेर, देविदास पाटेकर, माणिकराव थोरात,बाळासाहेब धोंडे,मधुकर वावरे, कृष्णा ढोरकुले, सुभाष पवार,मोहनराव देशमुख,अंबादास कळमकर,सुधाकर लांडे, नंदकिशोर पाटील, बाळासाहेब नवले,बाजीराव मुंगसे,अशोकराव मंडलिक,दत्तात्रय खाटीक, अड.सतीश पाटील आदी उपस्थित होते. बाळासाहेब आरगडे यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आभार मानले .
close