महाराष्ट्रात सिंचन क्षेत्रात काम करणारे प्रसिध्द नाव म्हणजे कै.बुधाजीराव शिंदे होय. म्हणजेच कै.रमेश शेठ शिंदे यांचे पिताश्री होत...!
कै.बुधाजीरावांनी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन धरणे,छोटे-मोठे बंधारे,पाट ,पाट चार्या तसेच रस्ते, रेल्वे लाईन चे कामे केली.जायकवाडी (पैठण)धरण, येलदरी धरण, भातसा धरण या सुप्रसिद्ध धरणावर खोदाईचे तसेच मिळेल ती कामे केली. सुरुवातीला अतिशय गरीबीचे दिवस होते. तेव्हा धरणावर पालं टाकून कसे बसे काम करुन दिवस काढले.नंतर मजुरांचे ठेकेदार झाले. हे सर्व काम करताना त्यांनी आपल्या व्यवहारात प्रामाणिकपणा जपला. त्यामुळे अल्पावधीतच शासकीय अधिकारी यांच्याशी आपल्या पवित्र कर्तृत्वाने मोठ्या प्रमाणात ओळख निर्माण केली...कामात प्रमाणिकपणा असल्यामुळे शासकीय अधिकारी म्हणजेच अभियंता (इंजिनिअर)असलेल्या अधिकारी यांनी बुधाजीरावांना ठेकेदार पध्दतीने कामे देण्यास सुरुवात केली. काम प्रामाणिकपणे करतात असे सिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी सिंचन क्षेत्रातील कामे अधिकृतपणे करण्यासाठी सदर कामाच्या संदर्भातील रजिस्ट्रेशन करून दिले. त्यांनंतर ओळखीच्या अभियंता यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी बुधाजीरावांना बोलावून कामे देण्यास सुरुवात केली. यातून बुधाजीराव कामात निपुण होत गेले.
अशातच थोडे गरिबीचे दिवस असताना बुधाजीरावांना दुसरे मुल जन्माला आले. त्यांचेच नाव रमेश शेठ होय. रमेश शेठ यांनी देखील बुधाजीरावांना गरिबीचे दिवस असताना तन-मन- धनाने मोलाची साथ दिली.त्यांनी देखील वडीलांच्या हाताखाली वेगवेगळ्या प्रकारचे कामे केली. खोदाई काम, चारी, पाट खोदाई चे कामे केली.. वडीलांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचे... त्यामुळे वडीलांनी देखील रमेशशेठ यांना शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावला. रमेश शेठ यांनी देखील सुरुवातीच्या काळात वडीलांना हातभार म्हणून मिळेल ती कामे केली.. आपल्या वडिलांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मौज मजा, सुखाचा त्याग केला.अखेरपर्यंत वडीलांच्या सेवेसाठी तत्पर राहिले. कै.रोहीदास शेठ, सिताराम शेठ, बाजीराव शेठ,शेंडेफळ सतीश शेठ ही मुले म्हणजे बुधाजीरावांची संपत्ती होय व रमेश शेठ यांची ती भावंडे होत.आज ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाले आहेत. रमेश शेठ चे मोठे बंधू कै.रोहिदास शिंदे यांचे पुत्र मा.स्वप्नील शिंदे हे या परीवाराचे राजकारणात प्रतिनिधीत्व करत आहेत.अहमदनगर महानगरपालिकेचे सभाग्रह नेते पदापर्यंत राजकारणात त्यांनी मजल मारली आहे.
बुधाजीरावांनी मुलांचे कल्याण व्हावे यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी करून स्वतः उपाशी पोटी राहुन मुलांना तळहातावरील फोंडा प्रमाणे जपले. त्यांच्यासाठी सर्व काही केले. शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही.रमेश शेठ वडीलांच्या बरोबर भटकंती करत असल्यामुळे त्यांचे शिक्षण झाले नाही.. बाकी मुलांनी जसे शक्य होईल तसे शिक्षण घेतले.
रमेश शेठ हे भावांच्या सहकार्याने स्थिर स्थावर झाले. महाराष्ट्रात शिंदे परिवाराचे फार मोठे नाव झाले. आज या परिवाराचे अनलिमिट काम करणाऱ्या चार कंपन्या आहेत. कालिका कंन्ट्रक्शन कंपनी,शिंदे ॲन्ड सन्स, सप्तशृंगी कंन्ट्रक्शन कंपनी आणि ऐश्वर्या कंन्ट्रक्शन कंपनी अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या चार नामांकित कंपन्या आहेत.
रमेश शेठ शिंदे म्हणजे अतिशय साधा सुधा दिलदार माणूस.मनाचे निखळ स्वच्छ व श्रीमंत असलेला माणूस. त्यांनी लहान पणापासून गरिबीत दिवस काढल्यामुळे ते नेहमीच गरिबांच्या संपर्कात राहत असत. त्यांनी देखील भावांना कधी दुखावले नाही. शिंदे परिवाराच्या आलीशान विवाह समारंभात देखील ते मोठ्या लोकांत न बसता आपल्या गरिब मित्रांमध्ये बसणे पसंत करायचे.एवढे ते साधे भोळे ..! त्यांनी कधीच श्रीमंतीचा अहंकार केला नाही की आविर्भावात राहिले नाही...
रमेश शेठ शिंदे यांचे सामाजिक कार्य...!
त्यांनी अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. तेव्हा आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून प्रत्येक गावागावात जाऊन समाज बांधवांना भेटी दिल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.. जे शक्य होईल ती मदत त्यांनी केली. वेळप्रसंगी महाराष्ट्भर दौरे केले. त्यांना समाज पुढे जावा. त्यांची गरिबीची दरी कमी व्हावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन कामे केली. अनेक ठिकाणी सत्याग्रह, उपोषण, आंदोलन केली. मेळावे घेतले. जसे काम करता आले तसे काम केले.
रमेश शेठ शिंदे यांचे समाजामध्ये आजही नावलौकिक आहे. त्यांचे समाजातील योगदान अजरामर आहे.त्यांनी समाजाला दिशा देण्याचे मोलाचे काम केले.अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी सुस्त व निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे वरीष्ठ पातळीवर समाजाचे काम न झाल्याबद्दल आपले जवळचे मित्र पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश जेठे यांचे बरोबर नेहमी खंत व्यक्त करायचे. रमेश शेठ शिंदे व रमेश जेठे सर यांची मैत्री सगळ्या महाराष्ट्राला माहीती आहे.. रमेश शेठ आपल्या जीवनातील सर्व सुख दुःख रमेश जेठे यांचे बरोबर व्यक्त करायचे... !
रमेश शेठ यांनी जीवनात अनेक विश्वासू मित्र निर्माण केले. शेवटपर्यंत त्यांना भावाप्रमाणे जपले. कधीच कोणाचे मन दुखावले नाही.. असा मित्र पून्हा होणे नाही.असा राॅयल मित्र आपल्यातून निघून गेला आहे.... प्रिय मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली....😭🙏
दु:खाकित
रमेश जेठे सर व मित्रपरिवार
शिर्डी एक्सप्रेस परिवार..!

