शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
कोपरगाव तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत.. कारखान्यांची महंती महाराष्ट्र जाणून आहे.. कधी भावा वरुन भांडण.. कधी वजना वरून भांडण.. तर कधी कोणाची मदीरा श्रेष्ठ..
कोणाचा वाढदिवस आला की कोपरगाव शहरात फवारणी.. नेत्ररोग शिबीर, पाण्या साठी कारखान्याचे टॅंकर, शहरातील गणपती मंडळांना दरवर्षी भरघोस अर्थसहाय्य.. नवरात्रीच्या नऊ रात्री कोपरगाव शहरात दोन कार्यालय घेऊन मोठा दांडीया जागर चालतो...
गेली अनेक वर्षापासून मला वाटलेली खंत.. साखर कारखाने शेतकऱ्यांचे पण कारखानदार सगळ्या सुविधा शहरातील जनतेला शेतकऱ्यांचे पैशाने देतात.. ग्रामीण मधील ऐंशी गावातून शेतकरी ऊस पुरवठा करतात.. आजवर कोणत्या गावात फवारणी केली.. कोणत्या गावात गणपती, नऊ रात्री उत्सव भरवले.. कोणत्या ग्रामीण च्या महिलांचा जागर केला..
कोपरगाव शहरातील रांगोळी, गणपती आरस, गौरीचा आरस, दांडीया नाच, मिस कोपरगाव एक नव्हे अनेक स्पर्धा.. बक्षीस एकवीस हजार आकरा हजार.. शेतकऱ्यांचे पैशाने..
दोन्ही साखर कारखाने ऊस उत्पादन ची स्पर्धा भरवतात.. जो शेतकरी हेक्टरी सगळ्यात जास्त उत्पादन काढील त्याला दोन्ही साखर कारखाने सारखेच पारितोषिक देतात... रोख रुपये तीन हज्जार मात्र
ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी रोज शेतात जातो आठरा महिने.. वर्षाचे ७०% दिवस वीज रात्री बारा वाजता येते.. रात्रीची झोप त्यागून रानावनात शेतकरी कुटुंबाला सोडून रात्र काढतो.. वाघ, कोल्हे, साप ,विंचू, ऊन वारा पाऊस यांच्या सोबत सामना करतो... आणि विक्रमी ऊसाचे उत्पादन काढतो.. स्पर्धेत एकाला पारितोषिक कारखानदार देतात... "रुपये तीन हज्जार"
आमच्या शेतकऱ्यांचे पैशाने शहरातील पारितोषिक एकवीस हजार.. सगळ्या सोयी शहरातील जनते साठी.. आमचे शेतकऱ्यांचे कारखाने व आम्हालाच सावत्र वागणुक... पुर्वी नेत्यांचे कार्यकर्ते स्टेजवर शेतकरी बसायचे.. आता शहरातील वाळू तस्कर, ठेकेदार..
शेतकऱ्यांनी ह्या रावण प्रवृत्ती चा निश्चितच विचार करण्याची वेळ आली आहे.. ऊस जाळून तोडला जातो.
यानिमित्ताने आता तरी शेतकरी दादांनो बदला..
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! धन्यवाद..!!
सामाजिक कार्यकर्ते
संजय भास्करराव काळे
कोपरगाव.

