प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी*  :-

आज 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभर राष्ट्रीय एकता दौड (रॅली)  आयोजित करण्यात आली आली आहे...केज शहरातही केज तहसील प्रशासन व तालुका प्रशासनाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक व परत तहसील कार्यालय अशी दौड सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. या दौड चा समारोप तहसील कार्यालय प्रांगणात  शपथ घेऊन व राष्ट्रगीताने करण्यात आला. 




यावेळी तहसीदार मा दुल्हाजी मेंडके यांनी  सहभागी युवक-नागरिक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सहभागाबद्दल आभार मानले.या दौड मध्ये गटविकास अधिकारी राजेश मोराळे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, गटशिक्षण अधिकारी सुनील केंद्रे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रॅलीचे सूत्रसंचालन हनुमंत भोसले यांनी केले.