shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उमरी रस्ता प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी केज नगरपंच्यायत ला 30 नोव्हेंबर ची अंतिम मुदत!!

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-

केज शहरा अंतर्गत उमरी रस्ता मजबुतीकरण व काँक्रेटिकरण करण्याची मागणी केज विकास संघर्ष समिती गेली 20 वर्षांपासून करत आहे. सध्या या कामाची जबाबदारी केज नगरपंच्यायतने  घेतली असून या कामासाठी 10 लक्ष मजबुतीकरण व 88 लक्ष काँक्रेटिकरण साठी निधीही मंजूर झाला आहे. 




उमरी रस्त्याचे मंजूर काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने केज नगर पंचायत कडे मागणी करून 01 नोव्हेंबर रोजी 11 वाजेपासून बेमुदत घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

31 ऑक्टोबर 2022 रोजी केजच्या नगराध्यक्षा सौ सीता बनसोड मॅडम व मा हारूनभाई इनामदार यांच्याशी चर्चा होऊन या कामाची निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पाडण्यासाठी व  प्रत्यक्ष काम सुरुवात करण्यासाठी कांही वेळ मागितला असून  यासाठी समितीने 30 नोव्हेंबर 2022 ही अंतिम मुदत दिली असून तो पर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचे ठरवले आहे. 

केज नगरपंच्यायत ने दिलेल्या पत्रावर समितीचा विश्वास असून हारूनभाई इनामदार व  नगराध्यक्षा सौ सीता बनसोड मॅडम पत्रातील अश्वासनाप्रमाणे 30  नोव्हेंबर 2022 पूर्वी  दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उमरी रस्त्याचे काम सुरू करतील याची समितीला खात्री आहे. मात्र जर केज नगरपंच्यायतने दिलेल्या मुदतीत काम सुरू न केल्यास 1 डिसेंबर 2022 नंतर समिती आपले स्थगित केलेले आंदोलन पुन्हा बेमुदत सुरू करण्याचा इशारा देत आहे.

 तरी केज नगरपंच्यायतने उमरी रस्त्याच्या कामाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी असे समितीने म्हटले आहे.

close