shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डेदुरुस्ती युद्ध पातळीवर सुरु...

शिवप्रतिष्ठाणच्या टोल वसुली बंद करा तसेच तिव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाने घेतली दखल... 

मुंबई (महाराष्ट्र):- पुणे-नाशिक हायवेवर आळेफाटा, बोटा, घारगाव याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून दररोज अपघातामध्ये प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागत आहे, वेळोवेळी होणाऱ्या अपघातांमध्ये असंख्य निष्पाप बळी आत्तापर्यंत गेलेले आहेत, जोपर्यंत सदर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पुणे-नाशिक हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचेवर दाखल होत नाहीत तोवर दखल घेतली जाईलच कि नाही? असा संतप्त सवाल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी उपस्थित केला होता. 
सदर अपघात टाळण्यासाठी ताबडतोब पण दीर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती व्हावी तसेच अपघातांचे प्रमाण वाढलेल्या खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डे दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अन्यथा असंख्य प्रवासी, वाहनचालक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक हायवेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी दिला होता.

सदर निवेदनाच्या प्रती मा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मा.ना.नितीनजी गडकरी साहेब, (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार), मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार) (मंत्री-सार्वजनिक बांधकाम, वाहतूक)
मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, (पालकमंत्री,अहमदनगर जिल्हा) (मंत्री, महसुल,पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र सरकार)यांना  पाठविण्यात आल्या होत्या. 
सदर निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पूर्वीचा सवलतधारक मेसर्स केएसईएल करार संपुष्टात आला आहे, आणि देखभाल कामासाठी नवीन देखभाल एजन्सी नियुक्त केली आहे.
 NH-60 च्या खेड - सिन्नर विभागाच्या देखभाल कामासाठी M/s KCPL, देखभालीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. मुख्य कॅरेजवे आणि सर्व्हिस रोड येथे हॉट मिक्स मटेरियलने पॅचवर्क/खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, आणि ते लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. सर्व खड्डे भरण्याचे आणि संकटाच्या पृष्ठभागाचे पुनरुत्थान करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सध्या सर्वच मोठे खड्डे बुजविण्यात येत आहेत.
नवीन मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर मेसर्स केसीपीएलला देखभालीचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, आणि अंदाजाच्या तरतुदीनुसार आणि साइटच्या आवश्यकतेनुसार बॅड पॅचवर DBM/BC सह आच्छादनाचे काम प्राधान्याने पूर्ण करा.

एनएच फी नियमानुसार टोल फी वसूल केली जात आहे.

त्यासाठीची सध्याची देखभालीची छायाचित्रे तुमच्या संदर्भासाठी सोबत जोडली आहेत.
आम्ही तुमच्या टिप्पण्या आणि काळजीची प्रशंसा करतो आणि भविष्यातील कोणत्याही अभिप्रायाचे स्वागत आहे. असे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेला सदर  प्राधिकरणाने कळविले आहे.
close