बोरी गावचे सुपुत्र व इंदापूरशहराचे रहिवासी गजानन ठोंबरे सर यांचा एकषष्ठी सामाजिक उपक्रमातून साजरी.
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूरचे निवृत्त शिक्षक व एलआयसी चे चेअरमन क्लब मेंबर गजानन निवृत्ती ठोंबरे राहणार इंदापूर त्यांच्या ६१ वा अभिष्टचिंतन हा एकषष्ठी म्हणून त्यांच्या मुली मयुरा मधुकर पाटील व दीपमाला विकास हूगे यांनी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजित केला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गजानन ठोंबरे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सामाजिक उपक्रम म्हणून श्रावणबाळ आश्रमातील मुलांना या ठिकाणी खाऊ वाटप आणि रोख रक्कम अकरा हजार रुपये देण्यात आले तसेच गरीब गरजू लोकांना ब्लॅंकेट मिळावे म्हणून युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर या समूहास ६१ ब्लॅंकेट देण्यात आले.
या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे ,पिंपरी चिंचवडचे उद्योजक महादेव कवितके, इंदापुरातील आर्किटेक्ट वसंतराव माळुंजकर, अहिल्यादेवी संस्था आळंदीचे अध्यक्ष जयवंतराव कवितके, पुणे येथील बाळासाहेब डफळ, पुण्यातील विठ्ठलराव पांढरे, गोकळी गुरुकुलचे हरणावळ सर, शिवाजी इजगुडे, माजी सैनिक सुभाष थोरात, सचिन सपकळ, सतीश पांढरे, प्रशांत सिताप, पियुष बोरा,अमर गाडे, माळुंजकर ताई, पोपट शिंदे, अनिकेत वाघ, बाळासाहेब व्यवहारे, श्रीधर बाब्रस ,सोमनाथ जावळे,सामसे सर ,डॉ. गार्डे, डॉ. पाटील, पुणे येथील प्रमोद हूगे, काळे सर, खराडे सर, शिर्के सर, गामाजी सर, हेगडे साहेब, चौधरी सर तसेच सर्व सेवानिवृत्त व इतर शिक्षक एलआयसीचे ऑफिसर व इतर इंदापूर व बोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गजानन निवृत्ती ठोंबरे यांचे गाव म्हणजेच बोरी १९६१ साली त्यांचा ३० ऑक्टोबर रोजी एक गरीब कुटुंबांमध्ये जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव निवृत्ती ठोंबरे तर आईचे नाव हौसाबाई ठोंबरे कष्टकरी कुटुंबात जन्माला आलेले गजानन ठोंबरे यांनी आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद सार्थ ठरवत त्यांनी लहानपणापासून शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर प्रथमच इंदापूर नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणून मुलाखत दिली त्यावेळी स्वर्गीय शंकराव पाटील यांनी त्यांना या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करीत त्यांनी पुढील शिक्षण घेत घेत बीएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर एम. ए .एम. एड. पूर्ण करून ते त्या ठिकाणी सहशिक्षक या पदावर ती विराजमान झाले. त्यांनी २८ वर्ष सेवा केली तसेच याबरोबर त्यांनी ३२ वर्ष एलआयसी मध्ये एजंट म्हणून काम केले. या काळात त्यांनी चेअरमन ऑफ मेंबर या पदापर्यंत मजल मारत आपले कार्य सिद्ध केले. याबरोबर त्यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून विविध माध्यमातून सहकार्य ही केले. त्यांच्या या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक सवंगडी तसेच मित्रपरिवार याच्याशी नाळ बांधून प्रकरतेने आपले विचार मांडत आपले वलय निर्माण केले. त्यांच्या आयुष्यामध्ये पत्नी, दोन मुली असून दोन मुलींनाच त्यांनी आपली मुले मांनले आणि आपला संसार उत्तमरीत्या उभा केला. त्याचेच प्रचिती म्हणून आज त्यांच्या मुली व जावई यांनी त्यांचा एकषष्ठी मोठ्या थाटामाटात साजरा केला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी ठोंबरे सरांच्या जीवनाबद्दल वेगवेगळे अनुभव आपल्या मनोगतामध्ये प्रकट केले व त्यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,ठोंबरे सर यांच्या दोन्ही मुली या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक माणसाची प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन आदराने विचारपूस करीत बसण्यासाठी विनंती करीत आहेत इतकी बारीक काळजी करणाऱ्या या दोन्ही मुलींकडे पाहिल्यानंतर ठोंबरे सर तुम्ही जो निर्णय घेतला होता तो अत्यंत योग्य होता. आम्हाला वाटलं पवार साहेबांनंतर कोण तर तिकडे बारामतीला पवार साहेब तर इकडे इंदापूर मध्ये ठोंबरे सर .मी नेहमी म्हणतो अगदी लहानपणापासून" मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी" ते खरंच या ठोंबरे सरांच्या मुलींनी दाखवून दिले. पित्याची सेवा कशी करायची असते ती या दोन्ही कन्येने दाखवून दिलेले आहे. तसेच ठोंबरे सरांचे मेहुणे कवितके यांनी पिंपरी चिंचवड येथे मोठे उद्योजक म्हणून नाव मिळवलेले आहे. २००९ साली मी आमदारकीला उभे राहिलो त्यावेळी ठोंबरे सरांचे स्वरूप मला पाहायला मिळाले. अत्यंत लडवया, चुकीला चूक मानणारा, जिथे अन्याय होत असेल तर अन्यायाविरोधात आवाज उठवणारा आणि दोस्तीचा राजा इंदापूरकरावर प्रेम करणारा राजा माणूस म्हणजे ठोंबरे सर होय .आयुष्यामध्ये तुम्ही खूप सहन केलेले आहे तुमचे गाव बोरी गाव या गावातील मंडळी तसेच इंदापूर शहरातील तुमच्या संबंधातील सर्व मंडळी येथे दिसत आहेत. तुम्हाला भविष्यामध्ये जे काही करता येईल ते करा आज सामाजिक कार्यातून श्रावण बाळ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप तसेच त्यांच्यासाठी रोख रक्कम दिले. त्यांच्या आनंदात सामील झाला मोठी माणसं आपण केलेले सहकार्य विसरतील. गरीब गरजू माणसांना सहकार्य केले की ते माणसं आपल्याला विसरणार नाहीत म्हणून तुम्हाला सांगतो. या आश्रमातील मुलांच्या आजच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे हे सर तुमच्या कामाची पावती आहे. असंच सहकार्य सर्वांनी करावं. युवा क्रांती प्रतिष्ठानला गोरगरीब गरजूंना वाटण्यासाठी सरांनी ६१ ब्लॅंकेट दिले. या देण्यामागचा उद्देश म्हणजे इंदापूर शहरातला गरीब माणूस थंडीमध्ये झोपताना त्रास होऊ नये म्हणून ही काळजी या सरांनी घेतलेली दिसून आली आहे. खरंच युवा क्रांती प्रतिष्ठानच्या सर्व समूहाचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या समूहाच्या माध्यमातून चिमणी पासून माणसापर्यंत काळजी घेऊन काम करीत आहेत म्हणून आज सरांनी ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी दिले. खरंच सर हेच खरे पुण्य आहे .काम तर सगळेच करतात परंतु काम असं करा की त्या कामाची नोंद घेतली पाहिजे. या जगात असो की नसो परंतु या सर्वसामान्य गरिबांचे काम करून त्यांची नोंद घेण्यासारखे काम ठोंबरे सर आपण करताय त्याची दुवा तुम्हाला निश्चित प्रकारे लागेल. तुमची तीन भाऊ-बहीण सर्व परिवार शिक्षक एलआयसीतील सर्व सहकारी व इतर सहकारी आज अभिष्टचिंतनाला उपस्थित आहेत. खूपच चांगलं काम भविष्यात होवो हीच परमेश्वराला प्रार्थना करून सर्वांच्या वतीने एकषष्ठी अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा देतो . अशा शब्दात त्यांनी यावेळी मत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आयोजन मयुरा पाटील ,मधुकर पाटील, दीपमाला हुगे ,विकास हूगे यांनी केले.

