भोसरी:- विद्यार्थ्यांना आपल्या सणांविषयी माहिती व्हावी, आपल्या परंपरा समजाव्यात'संस्कृतीची ओळख व्हावी, चांगले संस्कार व्हावे, आदर्श, नित्य मूल्य रुजावीत, राष्ट्राभिमान निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार दिनांक ४/१०/२०२२ रोजी शाळेच्या क्रीडांगणातसकाळी ९:००:०० ते १०:३० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात चिमुकलेविद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, नारायण हट सोसायटीतील सभासद, शिक्षण संस्थेचे संचालक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला "हत्तीच्या प्रतिमेचे" पूजन पालकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरशाळेच्या प्राचार्य, विजय चौगुले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रस्ताविकामध्ये "भोंडला" या विषयीची पुढील माहिती सांगितली."भोंडला" हा महाराष्ट्रात प्रचलित स्त्रियांचा सामुहिक खेळाचा प्रकार असून नवरात्रीत नऊ दिवस व दसऱ्याला हा खेळ खेळला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्रांचे प्रतीक असलेल्या 'हत्तीचे प्रतिमा' काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती फेर धरला जातो. व स्त्रियांच्या भावविश्वाबद्दलची विशिष्ट चालीतील वेगवेगळी गाणी म्हटली जातात. ही गाणीमौखिक परंपरेने पुढील पिढीपर्यंत पोहोचवली जातात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो".
त्यानंतर भोंडला कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. फेर धरून पालक, विद्यार्थी, शिक्षक, यांनी एकत्रित विविध गाणे म्हणत भोंडल्याचा आनंद घेतला.भोंडल्याची सुरुवात: ऐलमा पैलमा गणेश देवा! माझा खेळ मांडू दे! करीन तुझी सेवा!.. या गाण्याने झाली.
अक्कण माती चिकन माती! अशी माती सुरेख बाई जातं ते रोवाव!..
कारल्याचा वेल लाव ग सुने! लाव ग सुने!..
शिवाजी आमचा राजा त्यांचा जो किल्ला तोरणा..!
एक लिंबू झेलू! बाई दोन लिंबू झेलू!..
यासारखी जुनी पारंपारिक गाणी मोठ्या उत्साहाने म्हणत, फेर धरून "भोंडला" कार्यक्रम रंगला होता.
कार्यक्रमाच्या शेवट: "आड बाई आडोणी! आडाचं पाणी काढोनी, आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला!"..या गाण्याने झाली.
भोंडलासंपल्यानंतर खिरापत वाटप करण्यात आले. खिरापत ओळखण्याचा ही कार्यक्रम झाला. सर्वांनी एकत्रित याचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण संत हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे अध्यक्ष: संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे,डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार तारळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, श्री प्रवीण भाकड यांनी केले.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर विविध संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जात आहेत.त्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढत आहे.

