shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेत ३० लाख रुपये कर्ज मर्यादा पर्यंत वाटपास सुरुवात

इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेत ३० लाख रुपये  कर्ज मर्यादा पर्यंत  वाटपास सुरुवात
इंदापुर प्रतिनिधी- ५ ऑक्टोबर २०२२
 इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्था मर्यादित इंदापुर या संस्थेच्या ९९ वर्षांच्या इतिहासात  प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेऊन ३० लाख रुपये कर्ज मर्यादा पर्यंत वाटपास दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरुवात करण्यात आली. सभासदांचे हित लक्षात घेऊन व वाढीव गरजा लक्षात घेऊन इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे सभापती  आदिनाथ धायगुडे उपसभापती रामचंद्र शिंदे व सचिव प्रशांत भिसे यांनी विजया दशमीचा मुहर्त साधत ३०लाख पर्यंत कर्ज वाटप करत असल्याचे संचालक मंडळाच्या बैठकित जाहीर केले.

  सर्वात कमी ९%व्यादराने ३०लाख रुपये कर्ज देणारी अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाईल असा विश्वास स्वाभिमानी परिवाराचे नेते नानासाहेब नरुटे,सहदेव शिंदे,सतिश शिंदे,सुहास मोरे,यांनी व्यक्त केला.
  सभासदांची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन तातडीची कर्ज मर्यादा ७५हजार करण्यात आली.दुर्दैवाने एखादा सभासद मयत झाल्यास त्यांच्या वारसास २०लाख मदत देण्याचे   संचालक मंडळाने ठराव संमत केले. असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे.
  संस्था सामान्य सभासदांचे हित जपत असताना DCPS/nps धारक सभासदांना शिक्षक कल्याण निधिमधुन ३१लाख रुपये व विम्यामधुन १०लाख अशी ४१लाखाची मदत जाहिर केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी संस्थेचे विशेष अभिनंदन केले.

संस्था सामान्य सभासदांना सन्मान देऊन मोठा नावलौकिक प्राप्त करील असे मत दत्ताञय तोरसकर,सुरेश पांढरे,उद्धव गरगडे,कैलास वणवे यांनी व्यक्त केले.
  आज पासून ३०लाख मोठे कर्ज वाटप सुरु करण्यात आले.असा मोठा निर्णय घेतल्याने सभासदांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे,अनेक सभासदांनी आपले कर्ज मागणी अर्ज दाखल केले.उपविधि नुसार नियमास अनुसरून कर्ज वाटप केले जाईल असे ठाम मत जेष्ठ संचालक दत्तात्रय ठोंबरे,बालाजी कलवले,दत्ताञय चव्हाण,सतिश गावडे,सतिश दराडे,अनिल शिंदे,किशोर वाघ,भाऊसाहेब वनवे,सचिन देवडे,संजय म्हस्के,शशिकांत शेंडे,प्रशांत घुले,संतोष तरंगे,भारत बांडे,सदाशिव रणदिवे,संगिताताई पांढरे मॅडम यांनी व्यक्त केले.
close