हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जपणारे शिवशक्ती मित्र मंडळ कसबा इंदापूर 

नवरात्र उत्सवात सर्वधर्मीय समाजसेवेचे मानकरी श्री .व सौ . सायरा हमीद आत्तार यांचे हस्ते देवीची होम पुजा ..
इंदापूर प्रतिनिधी: 3 ऑक्टोबर रोजी देवीची विधिवत होम पुजा करणेत आली . यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री व सौ . महादेव चव्हाण सर आणि सामाजिक कार्यकर्ते
श्री व सौ . सायरा भाभी आत्तार , हमीदभाई आत्तार यादांम्पत्याचे शुभहस्ते पुजा पार पडली .
यावेळी इंदापूरचे ग्रामदैवत जोतिबा मंदिराचे पुजारी श्री . संदिप जाधव सपत्नीक उपस्थित होते, श्री अनिल चव्हाण सपत्नीक उपस्थित होते. चव्हाण परिवार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य  उपस्थित होते.तसेच आश्विन जाधव , साक्षी चव्हाण , समृध्दी चव्हाण , गणेश चव्हाण व सर्व परिसरातील भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते . श्री. गिरीश काका गुरव यांच्या सहकार्याने विधिवत होम पूजा करण्यात आली त्यांचे नेहमीच सहकार्य मंडळाला असते. गेली तीस वर्षे झाली पुरोहित काम मंडळाचे ते करत आहे . मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.