अंध कोण ..
शाप आहे अंधपणा
अंधश्रध्दा का मना
छान सृष्टी पहायची
त्यांची मनो कामना
अंधत्व शिक्षा आहे
नको असा उणेपणा
येऊ शकते उद्याला
वेळअसली आपणा
सर्वंगुणी आहे कुणी
न्याहाळा रुप दर्पणा
कृती उक्ती दोन्हीत
असावा डोळसपणा
करतआले सदोदित
काळोखाशी सामना
दिव्यांग शक्ती शाली
जाणा तया उपासना
नाही हो आदिमानव
विसरा जुन्या खुणा
रे पुरोगामी शतकात
विचाराचा मुक्तपणा
नेत्रदान उपाय भला
सुख देई कितीजणां
पुण्य कर्म जाण मर्म
मुक्त हो अल्प ऋणा
दृष्टीहीन हो कष्टहीन
महत्व मोठे नेत्रदाना
दूर दर्शी हे आवाहन
नेत्रदाना पुढे या ना
2)
सार्थ दृष्टी ..
सर्वोत्तम दृष्टी दान
जीवन करी सार्थक
सोपी सरळ साधना
संतुष्ट होई साधक
दानधर्म ही संस्कृती
माणूसकीचे द्योतक
नकळत पुण्य कर्म
निर्मुलन हो पातक
नेत्र हीन वाट पाही
होऊन जणूं चातक
येईलं दाता विधाता
संकटमोक्ष स्नातक
नाव नोंदणी आधी
सुखे हसेलं मस्तक
पुण्य नोंद आपसूक
भरेलं प्रगती पुस्तक
संस्थेला कळवायचे
होता कुणी रे मृतक
सत्कर्म साधनेसाठी
दूर सारायचे सुतक
नवीनदृष्टी नवीसृष्टी
जगा अनेक शतक
नवे रूप सुस्वरूप
जणूं जनले जातक
3)
नेत्रदान कसे ..
नेत्र दान सर्वोत्कृष्ट
जाणा जना महती
आपणांस ज्ञात जे
द्यावी दुजा माहिती
जागे असता संमती
अक्ष द्यावे मरणांती
वेदना मुळीचं नाही
कसली उरली भिती
इच्छा फक्त मनातून
बदले सारी आकृती
देण्या-याने देतजावे
हेचं शिकवे संस्कृती
मी अक्ष का द्यायचे
नको उगाचं विकृती
नाव नोंदणी करुनि
त्वरेनोंदवा स्विकृति
दुःखातूनि सावरावे
संस्थेस बोलवाअंती
आप्त कर्तव्य करी
मृतात्म्यास दे शांती
प्रक्रिया सोपीसुलभ
हवी अंमळ जागृती
नवी दृष्टी नवी सृष्टी
अमर राहू या जगती
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com

