shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा पुणे शहराच्या वतीने निषेध आंदोलन...!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधींचा निषेध नोंदवत पुणे शहर भाजपच्या वतीने सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. 

हिंदुद्रोही काँग्रेस सावरकरांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांचे अतुलनीय योगदान नाकारत त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून वाट्टेल ते बोलत सुटणाऱ्या काँग्रेसच्या पप्पूला चाप बसणे गरजेचे आहे. राहुल गांधींना त्यांच्या बेताल वक्तव्याची माफी मागावीच लागेल. यांनी काहीही बरळावे आणि इतरांनी मूग गिळून गप्प बसावे याची पुनरावृत्ती घडायला हे तिघाडीचे लाचार राज्य नाही तर स्वाभिमानी भाजप आहे. सावरकरांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
close