इंदापूरातील नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२२ चा सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी हा पुरस्कार देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनिताताई खरात यांना केले सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी इंदापूर येथे नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केल्याबद्दल नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२२ चा सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी हा पुरस्कार देऊन माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनिताताई खरात यांना सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी दिनांक ३० ऑक्टोबर रोजी*"दैनिक वाळवा क्रांती" च्यावतीने नवरात्र उत्सवामध्ये नवदुर्गांचा सामाजिक तसेच महिला दक्षता समिती ,या व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल, व त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील इतरांना मिळावी, यासाठी नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला, यात प्रामुख्याने "दैनिक वाळवा क्रांती"*मार्फत तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा,सौ.अनिताताई नानासाहेब खरात,यांना नवदुर्गे चा सन्मान हा पुरस्कार तसेच चांदीचा शिका पैठणी साडी व नथ देऊन दैनिक वाळवा क्रांती कडून सन्मानित करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका व परिसरातुन अनिताताई खरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जिवलग मित्र परिवार भिमानगर, शिवशंभू प्रतिष्ठान इंदापूर, शुभमभैय्या पवार मित्रपरिवार इंदापूर, च्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे वेळेस भेटून अनिताताई खरात यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच तेजपृथ्वी ग्रुप च्या सर्व सदस्यांनी भेटून अभिनंदन केले, व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या,

