Samajwadi party founder mulayam singh | समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे दिल्ली स्थित गुरुग्रामधील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
उत्तर प्रदेशात त्यांना "नेताजी " या नावानं ओळखले जात असे. त्यांनी स.पा.ची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या व श्वासाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती.
२०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं.
मृत्यूची पुष्टी करताना स.पा.चे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, माझे आदरणीय पिताजी आणि सर्वांचे लाडके नेते मुलायमसिंह यादव आपल्याला सोडून गेले आहेत".

