मराठी रंगभुमीवर दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
समर्थ अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवून रसिकांवर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल दुःखद निधन झाले. हे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये अतिशय दुःखाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार उपचांराना प्रतिसाद देत नसल्यानं आज विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे.
त्यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे गेले पंधरा दिवसापुर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले १५ दिवसांपासून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली रुग्णालयात उपचार सुरू होते. काल सकाळपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडली होती. मात्र रात्री 12 वाजता त्याचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार होते. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला होता. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलेले. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका अग्निहोत्र मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
अशा या कलाकारास शिर्डी एक्सप्रेस टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

