शौकतभाई शेख । श्रीरामपूर:-
तालुक्यातील पढेगांव येथे नेताजी सोशल फौंडेशन यांच्या माध्यमातून भव्य बांधकाम कामगार नोंदणी व बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर,अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतनाना धुमाळ, उद्योजक रणजित बनकर, उद्योजक जितेंद्र तोरणे, कारखान्याचे संचालक वाय.जी. बनकर, भाऊसाहेब कांदळकर, भाऊसाहेब बनकर, भास्कर लिप्टे, दौलतअण्णा बनकर, दत्तात्रय भांड, जमशेद पटेल, प्रफुल्ल दांगट, गणेश छल्लारे, केशव काळे, दिपक येसेकर, प्रवीण लिप्टे, अण्णासाहेब कांदळकर, राजेंद्र बनकर, सुदेश बनकर, स्वप्निल बनकर, आदित्य बनकर, विक्रम बनकर, राहुल कांदळकर, प्रशांत लिप्टे, अजय लिप्टे, गणेश काळे, किशोर मांजरे, महेश मांजरे, अनिल बनकर, रामचंद्र काकूळदे आदि उपस्थित होते.

