लासूर्णे येथे युवा वैदू समाज विचार मंच वैदू समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा वैदु समाजाचे दुसरी बैठक संपन्न.
वैदू समाजाच्या विविध समस्या वरती बैठकीत झाली चर्चा.
बैठकीत लहान पासून वृद्धांपर्यंत सहभाग.
इंदापूर प्रतिनिधी:शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी युवा वैदू समाज विचार मंच वैदू समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैदु समाजाचे दुसरे बैठक सकाळी दहा ते चार वेळेत लासूर्णे येथील निळकंठ मंगल कार्यालय या ठिकाणी पर पडली.या ठिकाणी समाजातील सदस्यांची ओळख, सामाजिक कामाचा आढावा, संस्थेचे व संघटनेच्या कार्यपद्धती, उपस्थित यांचे विचार ,प्रश्न उत्तरे इत्यादी बाबी वरती हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात इयत्ता सातवीचा विद्यार्थी ते ऐंशी वर्षांचे ज्येष्ठ आजोबा यांच्या सहभागाने अनेक तरुणांची महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, परभणी, सातारा, अक्कलकोट, पुणे,औरंगाबाद, अहमदनगर इत्यादी कानाकोपऱ्यातून आलेले लासूर्ने तालुका इंदापूर येथे स्व खर्चाने स्व इच्छेने वैदू समाज घडवण्यासाठी ठरलेल्या वेळी वैदू समाजातील इंजिनिअर,वकील, डॉ,व्यापारी, प्राध्यापक, पोलिस क्षेत्रातील नामवंत मान्यवर या ठिकाणी जमा होऊन बैठकीत कोठेही गडबड न करता शिस्तबद्ध पद्धतीने सहा तास विविध विषयावर विचार,वैदू समाजावरील अन्यायांची रोज घडणारे प्रसंग, गरीबी,अजुनही अनेकांना एका गावातून दुसऱ्या गावाला पोटापाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने अनेक अडचणी, शिक्षणाचा अभाव,अज्ञान, अंधश्रद्धा,राहण्यासाठी जागा नाही,घर नाही,फुग्यावर - भांड्यावर केस-भंगार गोळा करताना होणारा त्रास, वैदू जात गणना,नसलेले आधार कार्ड- रेशनकार्ड- रहिवासी दाखले या सर्व गोष्टींचा चिंतन मनन आणि उपाय,शासनाच्या वतीने मिळणाऱ्या सोयी- सवलती त्याची माहिती,शासन दरबारी संस्थेमार्फत पाठपुरावा करून निस्वार्थी प्रयत्नाने वैदू समाजाला येणाऱ्या काळात नक्कीच संविधानाचे ओळख, शिक्षण,आरोग्य, रोजगार आणि सामाजिक स्तर - राहणीमानात बदल घडवून आणू अशी शपथ घेऊन एक वेगळा अनुभव देणारा चळवळ उभी करणारा वैदू बांधवांचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नाशिक सिन्नर येथील राकेश धनगर, सुभाष शिंदे, अर्जुन पाबळे, अंबादास लोखंडे, रोशन पाबळे, हिंगोलीचे संतोष पवार ,तळेगाव ढमढेरेचे डॉ. अभिजित शिंदे, आकाश शिंदे पुणे हडपसरचे डॉ ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता शिंदे, सिद्धू शिंदे ,चतुश्रुंगी चे चंद्रकांत लोखंडे, करन आंब्रे, डॉ विट्टल जाधव, विनोद लोखंडे पिंपळे गुरव येथील सिनेअभिनेता अजय लोखंडे, विनोद पवार ,बाबासाहेब लोखंडे, गणेश लोखंडे, रामदास लोखंडे.गोविद शिदे केडगाव , चंदु वाघमोडे माळेगाव , मुंबई चे रॅप सॉंगर वेंकेटेश दासरी, जगदीश शिर्के नाशिक पेठ शिवाजी शिंदे, शिक्षिका डिम्पल शिंदे, परभणी चे गंगाधर शिंदे,संभा देशमुख औरंगाबाद येथील दुर्गादास गुडे .विशाल घोरपडे लासुर्णे . रावसाहेब वाघमोडे शेळगाव, रामा शिंदे विजयवाडी , आमोल शिदे, बुलढाणा येथील दीपक शिवरकर व राहुल चव्हाण, सुभाष शिदे डोरलेवाडी, बबलू निंबाळकर शेळगाव, बापू वाघमोडे, शशिकांत निंबाळकर, तानाजी शिंदे, तायाप्पा शिंदे, रामभाऊ शिंदे, लासुरणे. प्रकाश घोरपडे परांडा, असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शिंदे यानी केले तर आभार प्रदर्शन विनोद पवार यांनी मानले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पै. विशाल चंद्रकांत घोरपडे लासुर्णे यांनी दिली.

