शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
सोमवार रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे बाल दिनानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. धनंजय जगताप ( कवी, साहित्यिक, पर्यावरण प्रेमी ) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्तवन मंजिरीचा कार्यक्रम घेण्यात आला व ज्ञानेश्वर नागरे साई भक्त यांनी मुलांना स्टेशनरी व खाऊचे वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे बालदिन विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

