विश्वजीत मदने व ओम करे या मल्लांची जिल्हा पातळीसाठी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व तालुका क्रीडा संकुल इंदापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पै.रंगनाथ मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील १४ मल्लांनी सहभाग घेतला. त्यापैकी १७ वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ६५ किलो वजन गटात इयत्ता नववी मधील विश्वजीत मदने तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात ७१ किलो वजन गटात इयत्ता अकरावीमधील ओम करे याची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. आठवी मधील दादा शेंडगे हा ५७ किलो वजन गटात उपयोजित ठरला. विजयी खेळाडूंचा विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे यांनी सत्कार केला. शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर,श्रीधर बाब्रस, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे ,माजी विद्यार्थी कैलास कदम , यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना मारकड कुस्ती केंद्राचे पै.मारुती मारकड व क्रीडाशिक्षक सुनील मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय धेंडे, नितीन मदने, अंकुश फुले, संजय गायकवाड, प्रकाश पापत,बाबासाहेब साळुंके,निळकंठ शिंदे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

