प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे शिष्यवृत्ती परीक्षेत  उत्तीर्ण झालेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.




ज्ञानदा गायकवाड, आकांक्षा सांजूरे, श्रावण चाटे, आयुष सातपुते आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गदळे म्हणाले विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे मत व्यक्त केले. 

प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव जी. बी .गदळे, कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती शैला संदीप  इंगळे , मुख्याध्यापक वसंत शितोळे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मंगरूळकर यांनी केले सूत्रसंचालन श्री चोले यांनी तर आभार श्री भालेकर यांनी मानले कार्यक्रमास पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.