शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२
शिर्डीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाला आग
चहाच्या हॉटेलसह संपर्क कार्यालय जळून खाक || सहा लाखांचे नुकसान..!!
शिर्डी : शिर्डी शहरात लोकवस्तीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालय व चहाचे हॉटेलला आग लागली. आग लागली त्यावेळी संपर्क कार्यलय बंद होते. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही.या आगीत सहा लाखल रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज असून हॉटेलमधी गॅसचा स्फोट झाल्याने आग लागल्याची चर्चा परीसरात होती.
शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोड, पांडुरंगनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालयासह एका चहाच्या हॉटेलला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमुळे राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालय जळून खाक झाले. शेजारील एका चहाच्या दुकानालाही मोठी हानी पोहोचली आहे. येथील चहाच्या हॉटेलमध्ये गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणार्या ठिकाणी अशी भर दुपारी आग लागल्यामुळे मोठी धावपळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाला अचानक मंगळवारी आग लागली.
त्यावेळी संपर्क कार्यालय बंद होते. या अग्नीने मोठा पेट घेऊन या कार्यालयातील सर्व कागदपत्रे साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये विविध महत्त्वाच्या फायली कागदपत्रे विविध कार्ड तसेच खुर्च्या टेबल सोफासेट आदींसह विविध साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच येथील चहाच्या हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे. सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आग लागताच शिर्डी नगरपरिषदेचा अग्निशामक बंब व अग्निशामक दल येथे तात्काळ दाखल झाला. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने मोठा पेट घेतल्यामुळे हे संपूर्ण संपर्क कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या कार्यालया शेजारीच असणार्या एका दुकानालाही मोठी हानी पोहोचली आहे.
पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीने धुराचा लोट परिसरात पसरला होता. नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. दत्त जयंती उत्सवामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यात मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्यामुळे सर्वत्र काही वेळ धावपळ उडाली होती. आसपासच्या रहिवाशांनी आपल्यापर्यंत ही आग येऊ नये म्हणून मोठी दक्षता घेतली. काहींनी आपल्या दुकान व घरातील सामानही हटवण्यास सुरुवात केली होती. मात्र अग्निशामक दलाला नंतर ही आग विझवण्यात यश आले. तोपर्यंत हॉटेल व राष्ट्रवादीचे कार्यालय संपूर्ण जळून खाक झाले होते. लाखो रुपयांच्या साहित्याची हानी झाली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

