जंक्शन येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करावी नाहीतर आम्ही भिगवण बंद करून रस्ता रोको करू- मी वडार महाराष्ट्र संघटनेचे वतीने इशारा देत पोलीस स्टेशन भिगवन येथे दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी भिगवन पोलीस स्टेशन येथे जंक्शन येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करावी नाहीतर आम्ही भिगवण बंद करून रस्ता रोको करू असा इशारा देणारे निवेदन सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता गायकवाड,पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ , गणेश कुसाळकर सोमनाथ धोत्रे, श्याम जाधव, संदीप गुंडाळे ,जालिंदर जाधव, नागेश पवार यांनी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
या निवेदन पत्रामध्ये नमूद केले आहे की,इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी रोहित चतुर यांनी अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून शाळेत जात येत असताना सतत त्रास देत होता. त्याने मुलीस घरच्यांच्या समोर बाजार आणत असताना चाकूने हल्ला करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्या असून आरोपीस अद्याप अटक झालेली नाही .आपणास विनंती की आपण आरोपीस लवकरात लवकर अटक करावी नाहीतर आम्ही भिगवण बंद करून रस्ता रोको करू .आपण पीडित मुलीला योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन पत्र दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी भिगवण पोलीस स्टेशन येथे मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने दिले आहे.

