सामोडे ( दिलीप घरटे):
पिंपळनेर येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय संस्था पिंपळनेर व महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर या संस्थांच्या सचिव सौ.पुष्पलता संभाजी पगारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्या बद्दल ज्ञानसिंधु प्रकाशन संस्था नाशिक या संस्थेद्वारा संस्थेचे प्रकाशक तानाजी खोडे यांनी त्यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधू पुरस्कार जाहीर केला आहे.
हा पुरस्कार नाशिक, नागपूर, मुंबई , चंद्रपूर, संभाजीनगर या सर्व विभागातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना जाहीर झाला असून दिनांक १९ मार्च २०२३ रोजी संभाजी नगर येथे दिला जाणार आहे.
सौ.पुष्पलता संभाजी पगारे यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संचलीत अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील अध्यक्ष अॅड संभाजी पगारे, संचालक व्ही.एन.जिरेपाटील व सौ.शोभाताई जिरेपाटील, विजयराव सोनवणे व सौ.पुष्पलता विजय सोनवणे सौ. मिलिंद महाजन व सौ.गितांजली महाजन , विठ्ठलराव यशवंत पगारे व सौ. प्रमिला विठ्ठलराव पगारे, डॉ.सतिश पगारे व सौ.संगिता पगारे, डॉ.राजेंद्र पगारे व सौ.सविता पगारे (पं.सं.सदस्या ) तसेच मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप, प्राचार्य झेड.एम.गवळी, जेष्ठ शिक्षक मनेष माळी, उमेश माळी,प्रा.राजेंद्र सोनवणे व सौ.अर्चना राजेंद्र सोनवणे अधिक्षक एन.बी.वाघ,जे.पी.सोनवणे, प्रा.प्रविण पगारे,प्रा.गणेश भावसार,प्रा.भिकन पारधी, प्रा.विजय ठाकरे ,प्रा.पोर्णिमा भामरे, गणेश नेरकर,पी.डी.गायकवाड, विजय ढोले, संदिप पवार, श्रीमती सी.एस.पवार,शरद सुर्यवंशी, आदींनी अभिनंदन केले.

