नांदूरखी प्रतिनिधी(रामभाऊ पिंगळे):-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थस्थान असलेल्या शिर्डी मध्ये साई दर्शनासाठी साई भक्ताची तुडुंब गर्दी असते येथूनच नगर मनमाड महामार्गाची वाहतूक ही काही प्रमाणात होत असते तर साईंच्या दर्शनाला अनेक पालख्यासह साई भक्त शिर्डीत हजेरी लावतात सलग शासकीय सुट्या असल्या तर शिर्डीत साई भक्तांचा महापूर येतो वाहतुकीचे नियंत्रण टाळण्यासाठी व साई भक्तांना सुलभ सेवा देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शिर्डीत स्वतंत्र वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेची निर्मिती झाली वाहतूक पोलिस निरीक्षक अनेक वाहतूक पोलिस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतात याच वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतूक करणारी गाडी अक्षरशः जुनी झाली असून काही वेळा काही गाड्यांचा पाठलाग करतांना या गाडीला बराच आटा पिटा करावा लागतो अति जोराने आलेली वाहतुकीची नियम मोडणारे वाहने काही वेळा वाहतूक पोलिसांना चुकारा देऊनही निघून जातात परिणामी दंडाची रक्कमही वसूल होत नाही तर शिर्डीजवळच विमानतळ असल्याने अनेक पक्षाचे मंत्री पदाधिकारी साई दर्शनाला येतात यासाठीही शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेची कामगिरी मोलाची असते मात्र काम करण्याची इच्छा असूनही या गाडीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून कमीत कमी शिर्डी साठी तरी नव्या वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेला नवी गाडी पुरवठा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी शिर्डी सह परिसरातील जनतेतून जोर धरू लागली आहे तर गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अर्थमंत्री पदाचा पदभार आहे गृहविभागाने व राज्यशासनाने या मागणीला नकार देण्याची कोणतीही बाब शिलक राहणार नाही म्हणून आता शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेची गाडीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे झाली असल्याने या बाबीचा महसूलमंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा करून शिर्डी व परिसरातील जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष समीर वीर व रामभाऊ पिंगळे यांनी केली आहे
चौकट:-काही महिन्यांपूर्वीच शिर्डी पोलिस स्टेशन नवीन इमारतीचे तर पोलिस कर्मचारी वसाहत चे लोकपर्ण सोहळा संपन्न होऊन या इमारतीमध्ये कामकाज चालू आहे भव्य उपविभागीय अधिकारी दालन अद्यावत सुविधा युक्त सर्व कार्यालये या इमारतीमध्ये असून उपविभागीय अधिकाऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रतीची गाडी उपलब्ध आहे पोलिस निरीक्षक विभागाला सुद्धा गाडी उपलब्ध आहे मात्र पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेलाच जुन्या गाडीवर आपले कामकाज पार पाडावे लागत आहे तरी गृह विभागाने विशेष बाब म्हणून नव्या गाडीची व्यवस्था करावी.

