शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
साई बाबांच्या आशीर्वादामुळे शिर्डी पोलिस निरीक्षक पदाची धुरा आपण काही वर्षापासून प्रामाणिक पणे सांभाळून शिर्डीसह परिसरातील गावातील जातीय सलोखा टिकवण्याचे प्रामाणिक काम करून शिर्डी करांची सेवा केली अनेक सार्वजनिक उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने होणाऱ्या मिरवणुका सुरळीत पार पाडल्या पोलीस पदाच्या कार्यकाळात कोणताही राजकीय तेढ निर्माण होऊ दिला नाही हे सर्व करत असतानाच नुकतीच आपली शिर्डी वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावर काम करण्याची जबाबदारी मिळाली या जबाबदारीच्या माध्यमातून साई भक्तांना वाहतुकीबाबत कोणताही त्रास होऊ देणार नाही याची आपण दक्षता घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम करू असे प्रतिपादन नुतन वाहतूक शाखेत हजर झालेले पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सत्कार प्रसंगी उद्गार काढले.
पदभार घेतल्यानंतर साईभक्त हाजी अब्दूलबाबा यांचे पंतू गफ्फार पठाण पत्रकार संजय महाजन भाजपचे नानासाहेब शिंदे पत्रकार रामभाऊ पिंगळे यांच्या वतीने नुकताच गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वावी ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कोते पोलिस उपनिरीक्षक श्री जाधव हेही हजर होते.

