श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ या संस्थेतील श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ करमाळा या शाळेची शैक्षणिक सहल दिनांक 9.3.2023. वार गुरुवार रोजी रांजणगाव गणपती , शिवनेरी किल्ला या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान याबद्दल माहिती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांसाठी लेण्याद्री येथील उंच डोंगरातील लेण्या व अष्टविनायकातील गणपती यांचे कोरेगाव विद्यार्थ्यांनी पाहिले . तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी अष्टविनायक गणपती यांचेही दर्शन घेतले. या सर्वांमध्ये दिवसभरात शैक्षणिक सहलीबरोबर मनोरंजनात्मक मनमुराद आनंद घेतला दिवसभराच्या सहलीमध्ये मन प्रसन्न झाले व यानंतर वनभोजनाचा आनंद घेतला तसेच फोटो काढण्याचाही आनंद घेतला.
यावेळी सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे सर, विषय शिक्षक महादेव खरडे सर, गणेश सातपुते सर, रोहन भालेराव सर, सुदाम सरकुंडे सर, कलाशिक्षक श्री ज्ञानदेव गुरमे सर, तानाजी कुंभार सर, कर्मचारी दामोदर पर्वत, सौ सौ. सुनिता वाघ मॅडम व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सहलीसाठी संस्थेचे सचिव श्री चित्रसेन पाथरूड सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ पाथरूड सर यांनी शुभेच्छा दिल्या. या सहलीसाठी जय बजरंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक श्री मयूर राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.

