shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामदरा येथे वनप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठा- मनीष काळभोर यांचा स्तुत्य उपक्रम


लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा असणाऱ्या महादेव मंदिर डोंगर परिसरात जैवविविधता टिकवून त्याचे संवर्धन करण्याचे काम ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कार्य करत आहे. तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर च्या सभोवताली जंगल असल्याने या जंगलामध्ये विविध प्राणी आढळून येतात. उन्हाळ्याची चाहूल लागली.  प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू होते. त्यामुळे काही वेळेला जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये सुद्धा प्रवेश करतात. यावर ठोस उपाय म्हणून या वर्षी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आधारस्तंभ मनीष शेठ काळभोर, वनव्यवस्थापन समिती  अध्यक्ष श्री.युवराज शेठ काळभोर यांच्या  सहकार्याने रामदारा महादेव मंदीर डोंगर परिसरातील जंगलात पाणवठे तयार करून जंगली प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

तीर्थक्षेत्र रामदरा येथील तलावातून पाणी मोटरच्या साह्याने १७०० फुट पाईप लाईन करून पाणी डोंगर परिसरात नेण्यात आले आहे .डोंगर परिसरात ५१ पाणवठे तयार करण्यात येणार आहेत प्रत्येक पाणवठ्यावर जातीने लक्ष घालून उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर च्या वतीने घेण्यात येणार आहे 

 प्राण्यांची पानवठयाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आधारस्तंभ मा. श्री. मनिष शेठ काळभोर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.युवराज शेठ काळभोर तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वन विभागाचे स्थानिक ग्रामस्थांनी व पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले आहे.
close